S M L

"13 जणांवर गुन्हे दाखल, 26 साक्षीदार..,मग आमच्या नितीनला कुणी मारलं ?"

नितीनच्या आईवडिलांना धक्का बसलाय. नितीनचे मारेकरी कोण हा प्रश्न विचारला जातोय.

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2017 11:53 PM IST

साहेबराव कोकणे, अहमदनगर

25 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा इथल्या नितीन आगे हत्याप्रकरणी सर्वच आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलीय. त्यामुळे नितीनच्या आईवडिलांना धक्का बसलाय. नितीनचे मारेकरी कोण हा प्रश्न विचारला जातोय.

बारावीत शिकणाऱ्या 17 वर्षांच्या नितीन आगेचे गावातल्याच उच्चवर्णीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. याच रागातून २८ एप्रिल २०१४ रोजी मारेकऱ्यांनी नितीनला कॉलेजमधून उचललं आणि वीटभट्टीवर नेऊन अमानुष मारहाण केली. नंतर डोंगरातल्या झाडाला गळफास देण्यात आला. आपल्या तरुण मुलाला गमावणाऱ्या नितीनच्या आईवडिलांना कोर्टाच्या निकालामुळे मोठा धक्का बसलाय.याप्रकरणी १३ जणांविरुद्ध हत्या करणं, अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात शाळेचे शिपाई आणि शिक्षकांसह 26 साक्षीदार होते. प्रत्यक्षात न्यायालयात या सर्वांनी साक्ष फिरवली. गावातले इतर साक्षीदारही फितूर झाले. आरोपींविरोधात पुरावे सिद्ध न झाल्यानं सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष ठरवलं.

दिवसाढवळ्या नितीन आगेची हत्या झाली होती. राज्यभरात हे प्रकरण गाजलं. राजकीय पातळीवर अनेक आश्वासनं दिली गेली. पण नितीनला न्याय मिळालाच नाही. नितीनला मारलं कुणी या प्रश्नाचं उत्तर त्याच्या आईवडिलांना कोण देणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 11:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close