आधी पंखा आणा, मग पेशंट आयसीयूमध्ये दाखल करा; नाशिकचे शासकीय रुग्णालय व्हेंटिलेटरवर

नाशिकच्या संदर्भ सेवा या शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूत वातानुकूलित मशीन तर सोडाच पण साधा फॅन देखील नाहीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2018 11:05 PM IST

आधी पंखा आणा, मग पेशंट आयसीयूमध्ये दाखल करा; नाशिकचे शासकीय रुग्णालय व्हेंटिलेटरवर

कपिल भास्कर, नाशिक

 27 मार्च : आधी पंखा आणा,मग पेशंट आयसीयू मध्ये दाखल करा अशी परिस्थिती नाशिकच्या शासकीय संदर्भ हॉस्पिटलमध्ये आहे. गेल्या महिन्यापासून एसी बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहे. मात्र ह्या सोबतच हॉस्पिटल मधील सर्व लिफ्टस आणि काही यंत्रणा बंद असल्याने रुग्णांच्या अडचणीत आणखीनच भर पडत आहे.

नाशिकच्या संदर्भ सेवा या शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूत वातानुकूलित मशीन तर सोडाच पण साधा फॅन देखील नाहीये...तुम्हाला हवा लागत असल्यास घरून फॅन घेऊन या तिथले कर्मचारी सांगताहेत. त्यामुळे अनेकांनी आपल्या घरून टेबल फॅन आणलाय. एवढंच नाही तर रुग्णालयाच्या सर्व लिफ्ट आणि काही यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यानं रुग्णालयच सलाईनवर आहे.

न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं हॉस्पिटलला फॅन भेट देत या घटनेचा निषेध केलाय तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव पी डब्ल्यू डी विभागाला दिल्याचं सांगत हात झटकलेत.

खरं तर कोट्यवधी रुपये खर्च करून विभागीय संदर्भ सेवा हॉस्पिटल उभारण्यात आलंय. पण डॉक्टरसह इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीये. तर हॉस्पिटलचा मेन्टेन्स हा पीडब्ल्यूडी विभागाच्या टेंडर प्रोसेसमध्ये अडकल्यानं रुग्ण मात्र रामभरोसे असल्याचं दिसून येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 11:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...