नाशिककरांनो, तुमची उद्यानं तुम्हाला विचारताय, में ऐसा क्युं हूँ ?

नाशिककरांनो, तुमची उद्यानं तुम्हाला विचारताय, में ऐसा क्युं हूँ ?

उद्यानांची काळजी ना नाशिककर घेतायत ना सत्ताधारी पक्ष.... नाशकातलं जर एखादं उद्यानं बोलु लागलं तर कशा आपल्या व्यथा मांडेल... पाहुया आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट नाशिकच्या उद्यानाची आत्मकथा, में ऐसा क्युं हुँ

  • Share this:

23 मे: ठाणं जसं तलावांचं शहर म्हणुन ओळखलं जातं. तसंच नाशिक हे उद्यानांच शहर म्हणून ओळखलं जातं. पण ही उद्यानंच नष्ट होतायत. उद्यानांची काळजी ना नाशिककर घेतायत ना सत्ताधारी पक्ष.... नाशकातलं जर एखादं उद्यानं बोलु लागलं तर कशा आपल्या व्यथा मांडेल... पाहुया आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट नाशिकच्या उद्यानाची आत्मकथा, में ऐसा क्युं हूँ...

माझ्या अंगाखांद्यावर लोळणारी चिमुरडी, यांचा कलकलाट, भांडणं.. ही सगळी मला हवीहवीशी वाटणारी, मी नाशकातलं उद्यान...माझी वंशावळ नाशकात इतकी जास्त आहे की नाशकाला एकेकाळी गुलशनबाग म्हणायचे... मला किती अभिमान वाटायचा काय सांगु... पण ती ओळख आता पुसतेय की काय असं वाटतंय मला.. आता उद्यानात चिमुरडी, महिला, वयोवृद्ध हे नाही तर पत्ते पिसणारे, दारू पिणारे येतायत हो.. त्या वासानं मी गुदमरतोय....वृक्षाविंना मी रखरखीत झालोय... नाशिककरांनो मला असं कसं विसरलात हो...

माझे आजीआजोबा, आईबाबा लहान मोठी भावंडं मिळून आमची संख्या आहे..477.. नवल वाटलं ना नाशिककरांनो ऐकुन..आमची संख्या वाढतेय..माझी नवी भावंड येऊ घातलीयत.. तवली डोगर, पंचवटी, पेठ रोड भागात 3.36 कोटीचं वन उद्यान होतंय. पंचकला तर 99 लाखांचं वन उद्यान होतंय..खुप चांगलंय! पण आमच्या जुन्याजाणत्या उद्यानांच काय हो नाशिककर.. का मी असा झालोय..

नाशिककरांनो माझ्याकडे पाठ फिरवलीत.. आयांनी आपल्या पोराना मला न भेटायची तंबी दिलीय हो....माझी ही अवस्था का आहे.. मैं ऐसा क्यु हुं???

पालिकेनं आमच्यासाठी 8 कोटींची वारषिक तरतूद केलीय. पण तो पैसा आमच्यावर खर्च होतो का प्रश्न जसा मला पडलाय.. नाशिककरांनो तुम्हाला का नाही पडत... का नाही तुम्ही स्वत आमच्या देखभालीची जबाबदारी घेत???? का पालिकेला जाब विचारत नाहीत.. अहो राजकारण्यांवर अवलंबुन राहु नका हो.. पक्ष काय.. उन्हाळा पावसाळ्यासारखे सत्तेत येतील जातील पण तुम्ही तर तेच आहात ना..

नाशिककरांनो माझ्या या अवकळेला तुम्हीच जबाबदार आहात.. तुम्हीच..इतका निलाजरेपणा बरा नव्हे... तुमच्यासाठी नाही पण तुमच्या लहानग्या मुलांसाठी, नातवंडासाठी मला वाचवो हो..

- तुमच्या कृपेच्या अपेक्षेत

नाशिकचं मरणकळा आलेलं उद्यानं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2017 11:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading