पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पतींना 'भरोसा'चा आधार,वर्षभरात 273 तक्रारी !

पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पतींना 'भरोसा'चा आधार,वर्षभरात 273 तक्रारी !

रोजचं भांडण, संशय घेणे, पतीचे आईवडील आणि नातेवाईकांसोबत भांडणे, आई-वडिलांपासून स्वतंत्र राहण्याची मागणी करणे, अवाजवी खर्च करणे. अशा अनेक समस्यांचा सामना पतींनाही करावा लागतोय.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर

09 जानेवारी : घरगुती भांडणं, हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारात न्याय मिळवण्यासाठी पोलिसांनी वर्षभरापूर्वी भरोसा सेलची सुरुवात केली. पण हा भरोसा सेल महिलांसह पत्नीचा त्रास सहन करत असलेल्या पुरुषांसाठीसुद्धा मोठा आधार ठरतोय. गेल्या वर्षभरात २७३ पत्नीपीडित पुरुषांनी पत्नीच्या जाचापासून वाचवण्यासाठी या भरोसा सेलची मदत घेतलीय. यातील बऱ्याच प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आलंय.

घरगुती भांडणांमध्ये बऱ्याचदा महिलांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे आता पर्यंत बघावयास मिंळत होत पण बदलत्या जीवनशैलीमुळे आता शहरांमधील काही पुरुषांनाही पत्नीच्या जाचाचा त्रास होत असल्याचं लक्षात आलंय. रोजचं भांडण, संशय घेणे, पतीचे आईवडील आणि नातेवाईकांसोबत भांडणे, आई-वडिलांपासून स्वतंत्र राहण्याची मागणी करणे, अवाजवी खर्च करणे. अशा अनेक समस्यांचा सामना पतींनाही करावा लागतोय. याविरोधात दाद मागण्यासाठी पती सुद्धा आता नागपुरात सुरू झालेल्या भरोसा सेलची मदत घेवू लागलेय.

गेल्या वर्षभरात अशा २७३ पुरुषांनी नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मागितलीय. यातील बरीच प्रकरणांत समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आलंय.

जास्तीत जास्त घरगुती भांडणं सामोपचारानं कशे मिटवता येतील, यावर भरोसा सेलचा जास्त भर असतो. पत्नीपीडित पुरुषांनाही याची चांगली मदत होत आहे.

यातील बऱ्याच प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आलंय. पण मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापरही या कौटुंबिक कलहाच्या मागे असल्याचे दिसतंय.

First published: January 9, 2018, 7:08 PM IST

ताज्या बातम्या