सिंधुदुर्गात मुथूट फायनान्सची रबर लागवड वादात !

सिंधुदुर्गात मुथूट फायनान्सची रबर लागवड वादात !

सिंधुदुर्गातल्या इकोसेन्सिटीव्ह भागात जैवविविधतेने समृध्द असलेल्या हजारो एकर जंगलाची बेसुमार कत्तल करताना अनेक कायद्यांचा भंग केलाय

  • Share this:

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग

21 नोव्हेंबर : देशातली अग्रगण्य फायनान्स कंपनी म्हणून ओळख असलेल्या मुथूट फायनान्स कंपनीच्या संचालकांनी केलेली राज्यातली सर्वात मोठी रबर लागवड वादात सापडलीये. मुथूटच्या संचालकांनी अनेक कंपन्या स्थापन करुन सिंधुदुर्गातल्या इकोसेन्सिटीव्ह भागात जैवविविधतेने समृध्द असलेल्या हजारो एकर जंगलाची बेसुमार कत्तल करताना अनेक कायद्यांचा भंग केलाय. शिवाय राज्याच्या वन आणि महसूल विभागाने मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं गावकऱ्यांचा आरोप आहे.

कस्तुरीरंगन समितीने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेलं सिंधुदुर्गातलं उडेली गाव...या गावातले जैवविविधतेने समृध्द असलेले घनदाट जंगलांचे डोंगर आता सपाट होऊन रबराच्या झाडांनी भरलेयत. मुथूट फायनान्स कंपनीने अनेक कंपन्यांच्या नावे 1800 हून अधिक एकरवर या ठिकाणी रबर लागवड केलीय.

घनदाट जंगल असल्यामुळे अनेक प्राणी आहेत . वाघ आहे हरिण आहे सांबर आहे डुकर आहे माकड आहे ही जंगलतोड झाल्यामुळे त्याना राहायला झाड नाहीत, झुडप नाहीत त्यामुळे गाववस्तीत यायला लागलेत ते अतोनात नुकसान होतंय. शेतीच त्यामुळे गोरगरिबांच जगणं मुश्कील झालेल आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ विलास गावडे यांनी दिली.

मुथूटच्या संचालकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदीसाठी तब्बल 14 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र या सर्व कंपन्या फक्त कागदावरच आहेत.

 रबर लागवड वादात

- आंबोली रबर प्लॅन्टेशन - संचालक - जॉर्ज अलेक्झांडर मुथूट

- जिओ रबर अँड प्लॅन्टेशन - संचालक - अॅना अलेक्झांडर

- हळवल रबर अँड प्लॅन्टेशन - संचालक - जॉर्ज एम जॉर्ज

- मणेरी रबर अँड प्लॅन्टेशन - संचालक - जॉर्ज अलेक्झांडर

- उडेली रबर अँड प्लॅन्टेशन - संचालक - जॉर्ज जेकब मुथूट

- रंगना रबर अँड प्लॅन्टेशन - संचालक - जॉर्ज अलेक्झांडर मुथूट

अशा एकूण 12 कंपन्यांचे संचालक हे एकमेकांचे नातेवाईकच आहेत.

ज्या भागाचा सातबारा मुथूट फायनान्सचे मॅनेजिंग डायरेक्टर अलेक्झांडर जॉर्ज यांच्या नावाने आहे आणि हा भाग बघा जो सातबारात नमुद केलेला आहे. किती घनदाट जंगल वरती दिसतंय आणि जैवविविधतेने समृध्द अस जंगल ज्यात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अशा प्रकारे बेसुमार कत्तल करण्यात आलेली आहे. हा आंबोलीला लागून असलेला भाग...या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

मुथूट कंपनीने केलेली ही जंगलतोड संपूर्णपणे बेकायदेशीर आहे . त्याच्या बदल्यात जी झाडं लावली गेली पाहिजेत ती लावली गेली नाहीत. या जंगलतोडीविरोधात पर्यावरण आणि वनमंत्र्याकडे तक्रारी लोकांनी केलेल्या आहेत. माझ्याकडेही तशा तक्रारी आलेल्या आहेत . मी त्याचा पाठपुरावा करणार आणि त्याबाबत कंपनीवर कारवाई करावीच लागेल.

कंपनीवर कारवाई करावी लागेल असं खासदार म्हणत असले तरी या कंपन्यांनी केलेल्या बेकायदा कामांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हा प्रश्नच आहे.

First published: November 21, 2017, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading