Elec-widget

थर्टीफर्स्टला मुंबईकरांची जीवाची मुंबई, 1600 टन चिकनचा फडशा !

थर्टीफर्स्टला मुंबईकरांची जीवाची मुंबई, 1600 टन चिकनचा फडशा !

राज्यात एकूण 2500 टन चिकनची विक्री झाली. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत 8 ते 10 टक्क्यांनी मद्यविक्री वाढली.

  • Share this:

 प्रणाली कापसे, मुंबई

01 जानेवारी : उत्सवी आणि उत्साही मुंबईकरांचा जोष थर्टीफर्स्टलाही दिसून आला. मुंबईकरांनी नेहमीपेक्षा दहा टक्के जादा मद्य रिचवलं. तर तब्बल 1600 टन चिकनचा फडशा पाडला.

मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशन करताना मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात मद्य रिचवलं तर चिकनचाही फडशा पाडला.

एकट्या मुंबईकरांनी 1600 टन चिकनवर ताव मारला. तर राज्यात 900 टन ब्रॉयलर कोंबड्या विकल्या गेल्या. राज्यात एकूण 2500 टन चिकनची विक्री झाली. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत 8 ते 10 टक्क्यांनी मद्यविक्री वाढली.

मुंबईकर म्हटला तर थोडासा जास्तच उत्साही....नव्या वर्षाच्या स्वागतावेळी मुंबईकरांनी चिकन आणि मद्यावर आडवा हात मारून जिवाची मुंबई केल्याचं अधोरेखित झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2018 11:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...