स्पेशल रिपोर्ट : मनसे गाफील का राहिलं?

स्पेशल रिपोर्ट : मनसे गाफील का राहिलं?

अस्तित्व सांगण्यापुरता एक नगरसेवक या पक्षात शिल्लक राहिलाय. त्यामुळे ७ पैकी ६ नगरसेवक फुटण्याइतपत मनसे गाफील का राहिली असा प्रश्न निर्माण होतोय.

  • Share this:

 प्रणाली कापसे,मुंबई

14 आॅक्टोबर : शिवसेनेनं मनसे फोडून मुंबई महापालिकेतील आपलं पक्षीय वर्चस्व राखलं. पण यात मनसे मात्र भूईसपाट झालाय. अस्तित्व सांगण्यापुरता एक नगरसेवक या पक्षात शिल्लक राहिलाय. त्यामुळे ७ पैकी ६ नगरसेवक फुटण्याइतपत मनसे गाफील का राहिली असा प्रश्न निर्माण होतोय.

शुकशुकाट पसरलेलं मनसेचं हे पक्ष कार्यालय अनेक गोष्टींकडे लक्ष वेधू पहातंय. या कार्यालयाप्रमाणे बीएमसीतल्या मनसे पक्षातही शुकशुकाट पसरलाय. पक्षातले ७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेनं भाजपला शह देण्याबरोबरचं मनसेचा ही पालिकेतून पत्ता साफ केलाय.

अनेक पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा नव्यानं पक्ष बांधणीला सुरुवात केली होती. पण नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संपर्कात मात्र राज ठाकरे नव्हते. कुर्ल्यातून निवडून आलेले नगरसेवक दिलीप लांडे यांच्यावरचा अतीविश्वास राज ठाकरे यांना भोवला. गेल्या सहा महिन्यात गटनेता म्हणून राज ठाकरेंनी दिलीप लांडेंना मोकळा हात दिला होता. त्याचाच फटका राज ठाकरेंना बसलाय.

२०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसे संपली असं वाटत असताना ७ नगरसेवक आल्यामुळे पक्षाची लाज राहिली असं वाटत होतं. पण अचानक झालेल्या या घातपातामुळे तुर्तास तरी मनसे बीएमसीच्या राजकारणातून साफ झाली असं म्हणता येईल.

First published: October 14, 2017, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading