मुंबई, 10 जून : सध्या जगभरात एका व्हिडिओमुळं चांगलीचं खळबळ उडाली आहे. तो व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. त्यामागचं कारण म्हणजे त्या व्हिडिओत दिसत असलेल्या एका व्यक्तीनं पशूला लाजवेल असं कृत्य केलं आहे.
कुर्दीस्तामधील एका श्रीमंत व्यक्तीचा असून तो पेशानं गायक आणि कथीत वन्यप्रेमीही आहे. ब्लेंड ब्रिफकानी त्याचं नाव असून त्यानं वाढदिवसानिमित्त मित्रांना आमंत्रित केलं होतं. भलामोठा केकही आणला होता. यावेळी त्यानं आपल्या पाळीव सिंहासमोर बसून फोटोही काढले. वाढदिवासाच्या शुभेच्छा देत असतानाचं त्यानं ते किळसवानं कृत्य केलं.
बिफ्रकानीनं चक्क तो केक सिंहाच्य़ा तोंडावर मारला. अचानक केक तोंडावर मारल्यामुळं तो सिंह बिथरला. त्यावेळी तिथ असलेले त्याचे मित्र फिदीफिदी हसत होते.
तोंडावर केक मारल्यामुळं तो सिंह तडकन उठला आणि बाजूच्या सोफ्यावर गेला. त्याचा अवतार पाहून तिथ असलेल्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. बिफ्रकानीनं 4 जुनला हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि तो हाहा म्हणता जगभर प्रचंड व्हायरला झाला. आता पर्यंत जगभरातील ४० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसंच तो धक्कादायक प्रकार पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करतानाचं या व्हिडिओत दिसत असलेल्यांवर सडकून टीका केली.
लिओ असं या सिंहाचं नाव असून बिफ्रकानी त्याचा मालक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड ट्रोल झाल्यानंतर बिफ्रकानीला उपरती झाली. आपण लिओचा वाढदिवस साजरा केला असा दावा त्यानं केला आहे. तसंच अतिउत्साहात आपल्याहातून हे कृत्य घडलं असून सिंहाला त्रास देण्याचा आपला इरादा नव्हता, असं स्पष्टीकरणही त्यानं दिलं आहे. तसंच त्यानं या किळसवाण्या कृत्याबद्दल नेटकऱ्यांची माफी मागितली आहे. आपण वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करीत असल्याचा दावाही केला.
==================