टिळकांच्या अखेरच्या आठवणी नामशेष होण्याच्या मार्गावर ?

टिळकांच्या अखेरच्या आठवणी नामशेष होण्याच्या मार्गावर ?

भारतीयांच्या असंतोषाचे जनक ठरलेल्या लोकमान्य टिळक यांनी मुंबईतील सरदारगृह इमारतीत अखेरचा श्वास घेतला. लोकमान्य टिळकांच्या अमूल्य आठवणी असलेली ही इमारत आज दुरावस्थेत आहे.

  • Share this:

मंगेश चिवटे, मुंबई.

01 आॅगस्ट : भारतीयांच्या असंतोषाचे जनक ठरलेल्या लोकमान्य टिळक यांनी मुंबईतील सरदारगृह इमारतीत अखेरचा श्वास घेतला. लोकमान्य टिळकांच्या अमूल्य आठवणी असलेली ही इमारत आज दुरावस्थेत आहे.

"स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच" अशी ब्रिटिशांविरोधात भीमगर्जना करणारे लोकमान्य टिळक...."सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?" असा थेट प्रश्न विचारत ब्रिटिशांना जाब विचारणारे टिळक खऱ्या अर्थाने भारतीयांच्या असंतोषाचे जनक होते. दक्षिण मुंबईतील सरदार गृह या इमारतीत 1 ऑगस्ट 1920 साली टिळकांनी आपले प्राण सोडले. अत्यवस्थ असतानाच टिळकांना या इमारतीत ठेवण्यात आलं होतं. याच इमारतीच्या बाहेर मेडिकल बुलेटिन ऐकायला हजारो देशभक्तांची रांग लागायची...अखेरचा श्वास घेतल्यानंतर सरदारगृह मधूनच लोकमान्य टिळक यांची लाखोंचा जनसमुदाय असलेली अंत्ययात्रा निघाली होती. त्यामुळेच या इमारतीच राष्ट्रीय वास्तू म्हणून जतन व्हावं अशी अपेक्षा याच इमारतीत राहणाऱ्या विजया कामत यांनी व्यक्त केलीय.

म्हाडाने काही वर्षांपूर्वीच या इमारतीच डागडुजी केली असली तरी याची मजबूत पुनर्बांधणी व्हावी अशी अपेक्षा या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी व्यक्त केलीय.

सध्या सरदार गृह इमारतीचा आढावा घेतल्यास प्रत्येक मजल्यावर उघद्यावर पडलेल्या वायर पाहायला मिळतात. शॉर्ट सर्किट झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीची आग लागण्याची दुर्घटना लक्षात घेता तातडीने यासंदर्भात दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षाही येथील रहिवाशी विजया कामत व्यक्त करतात.

एकूणच टिळकांसारख्या एका थोर स्वातंत्र्यसैनिकाच्या अखेरच्या आठवणी नामशेष होण्याआधी त्या जतन करण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 10:39 PM IST

ताज्या बातम्या