जगात भारी..,कोल्हापुरी चप्पल जाणार सातासमुद्रापार

जगात भारी..,कोल्हापुरी चप्पल जाणार सातासमुद्रापार

कोल्हापूरला आलं आणि चप्पलांची खरेदी केली नाही असं होणारचं नाही

  • Share this:

संदीप राजगोळकर,कोल्हापूर

14 नोव्हेंबर :  कोल्हापूर म्हटलं की, जसा तांबडा पाढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ...तशीच कोल्हापूरी चप्पलही जगात भारी..आणि हीच चप्पल आता जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. कोल्हापूरमधला हा एक स्पेशल रिपोर्ट...

कराकरा वाजणारी ती कोल्हापुरी चप्पल...या चपलेचा रुबाब काही वेगळाचं..कोल्हापूरला आलं आणि चप्पलांची खरेदी केली नाही असं होणारचं नाही. आरोग्यासाठीही ही चप्पल लाभदायक आहेच..पण आता हीच चप्पल सातासमुद्रापार जाणार आहे..विशेष म्हणजे कोल्हापुरी चपलेचं मुळ रुप न बदलता नक्षत्र कलेक्शन अंतर्गत या चपलांची विक्री केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये बाटासह अनेक कंपन्यांनाही सहभागी करण्यात आलंय.

कोल्हापूरमध्ये चपलांची आर्थीक उलाढाल जवळपास वर्षाला 10 कोटी रुपये आहे.. पण याच चप्पल व्यवसायाला सध्या समस्यांनी घेरल्याचं चित्रही कोल्हापूरमध्ये आहे.

आजच्या बदलत्या शैलीनुसार आता या कोल्हापुरी चपलांचा विकास होणार हे नक्की...पण त्याचबरोबर हा व्यवसाय टिकला पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत हीच माफक अपेक्षा..

First published: November 14, 2017, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading