'रात्रीस चोरी चाले', नारळ उतरवून करायचे चोरी !

'रात्रीस चोरी चाले', नारळ उतरवून करायचे चोरी !

हळद-कुंकू...नारळ.. या वस्तूंनी गेले सहा महिने मुंबई पोलिसांची झोप उडवली होती. मुंबईत अनेक ठिकाणी चोरी, दरोडा पडल्यानंतर पोलिसांना तिथून काही अंतरावर हळद कुंकू आणि नारळ या वस्तू मिळायच्या

  • Share this:

06 फेब्रुवारी : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. पण एक अशी टोळी आहे जीची चोरी करण्याची पद्धत ऐकून तुम्ही देखील चक्रावून जाल...या टोळीनं गेल्या काही दिवसांत एक दोन नव्हे तर तब्बल 25 घरफोड्या केल्या.. कालभैरवावर अपार श्रद्धा असणाऱ्या टोळीला ना पोलिसांची भीती होती नाही कायद्याची...मात्र यावेळी कालभैरव चोरांना नव्हे तर पोलिसांना पावला.

हळद-कुंकू...नारळ.. या वस्तूंनी गेले सहा महिने मुंबई पोलिसांची झोप उडवली होती. मुंबईत अनेक ठिकाणी चोरी, दरोडा पडल्यानंतर पोलिसांना तिथून काही अंतरावर हळद कुंकू आणि नारळ या वस्तू मिळायच्या. चोरांच्या एका टोळीला पकडल्यानंतर पोलिसांना हे कनेक्शन लक्षात आलं. या टोळीला पोलिसांनी अटक केल्यानंतर जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा घरफोडीच्या हत्यारासोबत या वस्तूही मिळाल्या. आणि कालभैरव टोळी समोर आली.

या टोळीला ज्या भागात चोरी करायची आहे, त्या भागात हे चोर पुजा करायचे. देवीला हळद वाहून नारळ तीन वेळा गोल गोल फिरवायचे. तिसऱ्या वेळी नारळाची मागची बाजू ज्या दिशेला असे त्या दिशेला असलेल्या घरात किंवा दुकानात हे चोरी करायचे. अशा पद्धतीनं या टोळीनं आतापर्यंत 25 चोऱ्या केल्यात.

मात्र चोरीपूर्वी कालभैरवाचा कौल घेणारे पोलिसांच्या सापळ्यातून वाचू शकले नाही. या टोळीतल्या चार जणांना अटक करण्यात आलीये. त्यांच्या आणखी काही साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 11:28 PM IST

ताज्या बातम्या