S M L

शाबासकीसाठी अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धुळफेक

जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट....पण काही सरकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धूळफेक करतायेत. उस्मानाबादमध्ये असाच प्रकार उघडकीस आलाय.

Sachin Salve | Updated On: May 12, 2017 11:49 PM IST

शाबासकीसाठी अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धुळफेक

बालाजी निरफळ, उस्मानाबाद

12 मे : जलयुक्त शिवार हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट....पण काही सरकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धूळफेक करतायेत. उस्मानाबादमध्ये असाच प्रकार उघडकीस आलाय.

मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जलयुक्त शिवार योजना ओळखली जाते. मुख्यमंत्री दरवेळी या योजनेच्या यशस्वितेचे दोहे गातात. पण ही योजना प्रत्यक्षात कशी राबवली जाते हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसावं. जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या हिवरा गावातलं हे जलयुक्त शिवाराचं काम... एका दिवसापूर्वी रिचार्ज शॉफ्ट बोअर मारण्यात आलीये. यावरचा रंगसुद्धा ओला आहे. हे आम्ही बोलत नाही तर काम करणारे कामगार हे सांगतात.जशी बोअर एका रात्रीत मारली तसा हा बोर्डही लावला. कृषी अधिकाऱ्याचं उत्तर मात्र अजब असंच आहे.

हा सगळ्या उपद्व्याप मुखमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आहे. मुख्यमंत्री येणार काम पाहणार अधिकाऱ्यांचं कौतुक करणार...विधिमंडळात या कामाची आकडेवारी सांगणार...प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2017 11:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close