जलयुक्त शिवार योजनेवरुन युतीत वादाचा 'बंधारा'

जलयुक्त शिवार योजनेवरुन युतीत वादाचा 'बंधारा'

अमित शहा आणि मोदींसोबतच्या स्नेहभोजनानंतर उद्धव ठाकरे आणि सेना थोडी मवाळ झाली होती. पण जलयुक्त शिवारात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय.

  • Share this:

 प्रफुल्ल साळुंखेसह, दिनेश केळुसकर, रत्नागिरी

17 मे : अमित शहा आणि मोदींसोबतच्या स्नेहभोजनानंतर उद्धव ठाकरे आणि सेना थोडी मवाळ झाली होती. पण जलयुक्त शिवारात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय.

उद्धव ठाकरेंनी जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना भाजपमध्ये पुन्हा जुंपलीये. उद्धव ठाकरे आणि रामदास कदमांच्या आरोपांनंतर भाजपनं तातडीनं पत्रकार परिषद घेऊन असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.

प्रत्युत्तर देणार नाही ती शिवसेना कसली? राम शिंदे बालबुद्धीचे असल्याचा आरोप रामदास कदमांनी केला.

आम्ही देणारे नाही घेणारे असे सांगत शिवसेनेनं पावसाळी अधिवेशनात मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केलाय.

राज्य सरकारमधील मंत्री एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करू लागलेत. एनडीएच्या स्नेहभोजनानंतर उद्धव ठाकरेंनी टीकेची तलवार म्यान केली होती. पण आता पुन्हा शिवसेनेनं सत्तेत राहून विरोधकाची भूमिका कायम ठेवलीये.

First published: May 17, 2017, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading