'सरकारी काम चार महिने थांब', नाफेडला कोर्टात खेचण्याचा शेतकऱ्याचा इशारा

लालफितीच्या कारभाराला कंटाळलेल्या बाबा घुगे यांनी आता सरकारविरोधातच दंड थोपटलेत. त्यांनी थेट ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2018 10:29 PM IST

'सरकारी काम चार महिने थांब', नाफेडला कोर्टात खेचण्याचा शेतकऱ्याचा इशारा

कन्हैया खंडेलवाल, हिंगोली

06 फेब्रुवारी : सोयाबिन राज्य सरकारनं खरेदी तर केलं पण अडीच महिने झाले त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. पैसे मिळत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यानं नाफेडला कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतलाय.

सोयाबिन आणि तूर खरेदी करणाऱ्या नाफेड आणि सरकारवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडत चाललाय. हिंगोली जिल्ह्यातल्या धानवडच्या बाबा घुगेंनी तर नाफेडला ग्राहक न्यायालयात खेचण्याचा निर्धार केलाय. कारण नाफेडनंही तसाच कारनामा केलाय. नऊ नोव्हेंबर 2017 रोजी बाबा घुगे यांनी नाफेडला सोयाबिन विकला. पण तब्बल दोन महिन्यांनंतरही नाफेडनं त्यांना पैसे दिले नाहीत. त्यांनी परभणीच्या नाफेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तर तिथला अनुभव फारच भयानक होता.

लालफितीच्या कारभाराला कंटाळलेल्या बाबा घुगे यांनी आता सरकारविरोधातच दंड थोपटलेत. त्यांनी थेट ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय.

ही अडवणूक एकट्या बाबा घुगेंची नाही तर हजारो शेतकऱ्यांचे पैसे नाफेडनं थकवलेत. शेतमाल खरेदी करताना नाफेड अनेक अटी घालते. या अटी पार केल्यानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी सरकारदरबारी हेलपाटे मारावे लागतायत. त्यामुळे बाबा घुगे यांनी थेट ग्राहक न्यायालयात जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाला इतर शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळू लागलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...