S M L

तब्बल एक कोटीचं बक्षीस, शेकडो जवानांचा मारेकरी ; क्रूर माओवादी हिडमाचा पर्दाफाश

काळया गणवेषात सामान्य शरीरयष्टी असलेला खांद्यावर एके 47 ही अत्याधुनिक बंदुक असलेला, काही तार बांबुचे तुकडे आणि बॅटरीचा वापर करुन बाॅम्ब तयार करणाऱ्या जहाल माओवादी कमांडरच नाव आहे वासे हिडमा....

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2018 08:43 PM IST

तब्बल एक कोटीचं बक्षीस, शेकडो जवानांचा मारेकरी ; क्रूर माओवादी हिडमाचा पर्दाफाश

महेश तिवारी, गडचिरोली

30 मार्च : त्याचे हात किती जणांच्या रक्तानं माखले आहेत हे कदाचित त्यालाही माहीत नसेल.. वय अवघं 25 वर्षे, माओवादी चळवळीच्या नावाखाली त्यानं सुरू केलेला नरसंहार अजूनही थांबलेला नाही. तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहे. मात्र त्याच्यापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही. कारण तपासयंत्रणाकडे फक्त त्याचा एक फोटोच असल्याची माहिती मिळते. मात्र न्यूज 18 लोकमतकडे या क्रुरकर्माच्या व्हिडिओ हाती लागलाय. कोण आहे हा क्रूरकर्मा...याबदद्लचा हा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट..

माओवादी चळवळीच्या नावाखाली नरसंहार घडवणाऱ्या त्या क्रूरकर्माचं नाव आहे हिडमा...वासे हिडमा....

काळया गणवेषात सामान्य शरीरयष्टी असलेला खांद्यावर एके 47 ही अत्याधुनिक बंदुक असलेला काही तार बांबुचे तुकडे आणि बॅटरीचा वापर करुन बाॅम्ब तयार करणाऱ्या जहाल माओवादी कमांडरच नाव आहे वासे हिडमा....तुम्ही ऐकताय तेच नाव वासे हिडमा हा तोच हिडमा आहे ज्याने काँग्रेस नेत्यांच्या रैलीवरील झीरम घाटी हल्ला, 76 जवान शहीद झालेला दंतेवाडाचा ताडमेटला येथील हल्ला तसंच गेल्या पंचवीस जवानाना ठार करणारा बुर्कापालचा हल्ला असे तब्बल चाळीसपेक्षा जास्त हल्लयाच्या घटना घडवून शेकडो जवानांचा बळी घेतलाय.

या व्हिडिओ क्लिपमध्ये हिडमा आपल्या सहकारी माओवाद्यांना बाॅम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतोय. बस्तरच्या जंगलासह दंडकारण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना सर्वाधिक धोका या आयडी बाॅम्बचाच असतो. पोलिसासह सुरक्षा दलाकडे आतापर्यंत हिडमाचा एक फोटो तोही स्पष्ट नाही. त्यापलीकडे कुठलेही व्हिडिओ क्लिप उपलब्ध नाही.

Loading...
Loading...

देशात सुरक्षा दलांच्या जवानावर सर्वाधिक मोठा हल्ला माओवाद्यानी 10 एप्रिल 2010 ला दंतेवाडा जिल्हयात ताडमेटलाच्या जंगलात घडवला ज्यात 76 सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या घटनेचा मास्टरमाईंड असलेला हिडमा कंपनी नंबर 1 चा कमांडर होता. ताडमेटलाच्या घटनेत हिडमाच्या रणनितीमुळे मिळालेल्या यशामुळे माओवादी नेतृत्वाने हिडमाला बटालियननं एकचा कमांडर बनवलं. पोलिसांच्या लेखी हिडमाच्या नावावर पन्नासपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. हिडमा देशातल्या सर्वाधिक हिंसक घटना घडलेल्या बस्तरच्या सुकमा जिल्हयात सक्रीय असला तरी इतर राज्यातही घटना घडवण्यासाठी माओवादी त्याचा वापर करतात.

पोलिसांच्या लेखी हिडमा पोलिसांसाठी खूप मोठं आव्हान आहे.बटालियननं एक मध्ये 150 प्रशिक्षित जहाल माओवादी आहेत. या बटालियनमधल्या सगळया माओवाद्याकडे यु बी जी एल, एके 47 तसंच राॅकेट लाँचर सारखे अत्याधुनिक शस्त्र आहेत. हिडमाच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर बस्तर पोलिसानी 2 ते 3 वेळा त्याच्या अटकेसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्या कारवाईत जवानच हिडमाच्या अॅबुशमध्ये फसले होते.

हिडमा किती धोकादायक आणि जहाल आहे. त्यासाठी पाच राज्यांच्या पोलिसांनी एक कोटीपेक्षा जास्तीचे बक्षीस जाहीर केलंय. हिडमाच वैशिष्टय म्हणजे हिडमा केवळ हल्लयाची रणनितीच आखत नाही. तर तो त्यात प्रत्यक्ष सहभागीही होतो .हिडमा हा छत्तीसगडच्या बिजापूर जिल्हयातल्या पुवर्ती गावचा रहिवासी आहे त्याच्या गावाच वैशिष्टय म्हणजे या गावात प्रत्येक घरातून एक तरी सदस्य माओवादी संघटनेत आहेत.

देशासमोर माओवाद्यांचं मोठं संकट उभं आहे.. आणि वासे हिडमा माओवादी चळवळीतला मोठा चेहरा आहे. माओवाद्यांचा कणा मोडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा हिडमावरची कारवाई अटळ आहे. आणि त्यासाठी सुरक्षा यंत्रणा कोणती रणनिती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण आहे हा वासे हिडमा ?

- छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या पूर्वती गावचा रहिवासी

- पूर्वती गावातल्या प्रत्येक घरात किमान एक माओवादी

- दंतेवाडामध्ये माओवादी हल्ला, 76 जवान शहीद

- बुर्कापालमध्ये माओवादी हल्ला, 25 जवान शहीद

- काँग्रेस नेत्यांच्या रॅलीवर झीरम परिसरात हल्ला

- 50हून अधिक माओवादी हल्ल्यामागचा सूत्रधार

- अत्याधुनिक हत्यारं वापरण्याचं कौशल्य

- स्फोटकं बनवण्यात माहीर

- हल्ल्याची रणनिती आखण्यासह हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी

- 5 राज्यातली पोलीस मागावर

- हिडमाची माहिती देणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2018 08:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close