शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला काय मिळालं ?

शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला काय मिळालं ?

एका उदात्त मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरतात आणि स्वत:ला नेते मानणारे चार जण चर्चेत हारून परत येतात. अण्णांच्या लोकपालचं जे काँग्रेस सरकारनं केलं तेच आता भाजपनं शेतकऱ्यांसोबत केल्याची भावना आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, उदय जाधव आणि मंगेश चिवटे, मुंबई

03 जून : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचं काय झालं? किंवा उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळायला हवा त्याचं काय झालं? शेतकऱ्यांच्या नावाखाली निघालेल्या यात्रा संपल्या आणि आता संपालाही अर्धांगवायू झाल्यासारखी स्थिती आहे.

मुख्यमंत्र्यांना जरी शेतकऱ्यांना भरपूर दिलं असं वाटत असलं तरीही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याची भावना नाही. संपूर्ण कर्जमाफीसाठी अख्खा उन्हाळाभर यात्रा निघाल्या पण काहीच झालेलं नाही. शेतकरी संपातल्या वाटाघाटीवर तर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत.

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप फक्त काँग्रेस राष्ट्रवादीलेच करतायत असं नाही तर त्यांच्या सत्तेतली भागीदार असलेल्या सेनेलाही तसंच वाटतंय. शेतकऱ्यांचा संप मोडीत काढल्याचा थेट आरोप शिवसेनेनं केलाय.

बहुतांश वेळेस असंच होतं. एका उदात्त मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरतात आणि स्वत:ला नेते मानणारे चार जण चर्चेत हारून परत येतात. अण्णांच्या लोकपालचं जे काँग्रेस सरकारनं केलं तेच आता भाजपनं शेतकऱ्यांसोबत केल्याची भावना आहे.

मान्सूनची ढगं आता जमायला लागलीयत. दरवर्षी शेतकऱ्यांची फसवणूक होते पण तो निर्माता आहे. ढगं जमालयला लागली की जमिनीला जसा पान्हा सुटतो तसं शेतकऱ्यांचंही होतं. त्यामुळेच शेतकऱ्यांची लढाई अजून संपलेली नाही हेच खरं..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 10:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading