स्पेशल रिपोर्ट : खरंच संपूर्ण सातबारा कोरा करणं शक्य आहे का ?

स्पेशल रिपोर्ट : खरंच संपूर्ण सातबारा कोरा करणं शक्य आहे का ?

कर्जमाफी द्यायची आणि पुन्हा लगेचच निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असा जर देवेंद्र सरकारचा हिशेब असेल तर तो वाटतोय तितका सोपा नाही.

  • Share this:

06 जून : आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तर विरोधक आणि शेतकरी संघटना संपूर्ण कर्जमाफीची मागणी करतायत. संपूर्ण सातबारा कोरा करण्याची मागणी केली जातेय पण खरंच ते प्रत्यक्षात शक्य आहे का ?, ते पाहुयात..

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला तर खरोखरच देऊ केलेली कर्जमाफी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल. कारण मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार कर्जमाफी ही 30 हजार कोटींची असेल आणि त्याचा फायदा 31 लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो. मनमोहनसिंग यांनी 2007 साली जी कर्जमाफी केली होती.

त्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे फक्त 7 हजार कोटी रूपयांचं कर्ज माफ झालं होतं.  त्या तुलनेत फडवणवीस सरकारची घोषणा ही मोठी असेल.

उत्तर प्रदेशात 1 लाख रूपयापर्यंतचं कर्ज माफ केलं गेलंय. तोच नियम महाराष्ट्रात लावला गेला तर संपूर्ण सातबारा कोरा होणं शक्य नाही.  साधारणपणे ही कर्जमाफी कशी असेल ते एकदा पाहुयात...

राज्यात 1 कोटी 36 लाख 42 हजार शेतकऱ्यांपैकी

31 लाख 57 हजार शेतकरी थकबाकीदार

20 लाख शेतकरी 2012 पासून थकबाकीदार,

कर्जाचं पुनर्गठनही शक्य नाही

31 लाख थकबाकीदारांच्या कर्जाची रक्कम

30 हजार 500 कोटी

इतकी आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी अल्पभूधारक असण्याची अट ठेवलीय. म्हणजेच 5 एकर शेती असणाऱ्यालाच कर्जमाफी मिळेल. ज्यांचे एक दोन गुंठे जास्त असतील त्यांनाही काही मुभा असेल.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कर्जाच्या माध्यमातून 50 हजार कोटी रूपयांचं वाटप केलं गेलंय. त्यात कर्जमाफीच्या आशेनं फक्त 25 ते 30 टक्के कर्जाची परतफेड केली गेलीय. याचाच अर्थ असा की जे वीस हजार कोटी शेतकऱ्यांकडे शिल्लक असतील त्याचं काय करायचं. एवढंच नाही तर पुढच्या हंगामात त्यांना कर्ज कसं द्यायचं हाही सवाल आहेच. त्यामुळेच कर्जमाफी द्यायची आणि पुन्हा लगेचच निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असा जर देवेंद्र सरकारचा हिशेब असेल तर तो वाटतोय तितका सोपा नाही.

First published: June 6, 2017, 10:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading