मुख्यमंत्री महोदय, दुष्काळाचं दाहक वास्तव दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी का ?

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचे होत असलेले आंदोलन अशी परिस्थिती असली तरी भाजपच्या दृष्टीने सर्व आलबेल आहे, या बातम्या दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी आहे असा शोध मुख्यमंत्र्यांनी लावलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2017 07:18 PM IST

मुख्यमंत्री महोदय, दुष्काळाचं दाहक वास्तव दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी का ?

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

 

17 आॅगस्ट : राज्यात अर्धा अधिक भाग दुष्काळाच्या छायेत आहे, मराठवड्यात शेतकऱ्यांच्या 34 आत्महत्या झाल्यात. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचे होत असलेले आंदोलन अशी परिस्थिती असली तरी भाजपच्या दृष्टीने सर्व आलबेल आहे, या बातम्या दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी आहे असा शोध मुख्यमंत्र्यांनी लावलाय.

भाजपच्या राज्य कार्यकारणीची बैठक मुंबईत झाली. राज्यात दुष्काळाची छाया, मंत्र्यांवर वर होणारे भ्रष्टाचारचे आरोप, आणि प्रदेशाध्यक्षांबाबत निर्माण होणारे वाद या पार्श्वभूमीवर कार्यकारिणी बैठक पार पडली. मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आणि दानवेंनाही बदलणार अशी चर्चा जोरात असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यावर पडदा टाकला.

गेल्या काही काळात शेतकऱ्यांची मोठी आंदोलनं झालीत. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्रही थांबत नाहीय. आंदोलनं दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

Loading...

सुकाणू समितीच्या आंदोलनांवरही मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. 15 ऑगस्टला मंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन रोखणाऱ्या आंदोलकांना देशद्रोही म्हणायलाही फडणवीस विसरले नाहीत. पण राज्यात  शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे हे वास्तव कसं नाकारता येईल?

मुख्यामंत्री महोदय दुष्काळाचं वास्तव दाखवणं म्हणजे आपल्याला मीडियाची दुकानदारी वाटत असेल तर असो पण जनता सुजाण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...