स्पेशल स्टोरी : सरकारी 'बाबूं'चा प्रताप, मुख्यमंत्र्यांना मात्र डोक्याला 'ताप' !

पण प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे मात्र मुख्यमंत्री अडचणीत आलेत. अखेर त्यांना बाजूला करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2017 10:10 PM IST

स्पेशल स्टोरी : सरकारी 'बाबूं'चा प्रताप, मुख्यमंत्र्यांना मात्र डोक्याला 'ताप' !

रणधीर कांबळे, मुंबई

04 आॅगस्ट : सत्ता स्थापनेपासून स्वत:ची प्रतिमा जपण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरलेत. त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक करू शकले नाहीत. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे मात्र मुख्यमंत्री अडचणीत आलेत. अखेर त्यांना बाजूला करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी स्वच्छ प्रतिमेचे असले तरी त्यांचा कारभार मात्र स्वच्छ आणि पारदर्शक आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्यांच्या कारभाराचा गाडा हाकणारे प्रशासकीय अधिकारी मात्र भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये सापडतायेत. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून बड्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राधेश्याम मोपलवार व्यवस्थापकीय संचालक एमएसआरडीसी... राधेश्याम मोपलवार हे कथित ऑडिओ क्लिपमुळे वादात सापडले. त्यांची कारकीर्दही वादग्रस्त अशीच होती.

तेलगी स्टँप घोटाळ्यात मोपलवार यांचं नाव आलं होतं. आयकर विभाग, पीएमओ अशा वेगवेगळ्या तपासयंत्रणा त्यांची चौकशी करतायेत. असं असतानाही 48 हजार कोटींच्या समृद्धी हायवेची जबाबदारी त्यांच्यावर पडली. पण भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं मोपलवारांना मुख्यमंत्र्यांनी बाजुला केलं.

विश्वास पाटील, निवृत्त सीईओ, झोपु योजना

Loading...

पानिपतकार विश्वास पाटील यांच्यावर एसआरए प्रकल्पात झालेल्या आरोपांमुळे त्यांची झाडाझडती सुरू झालीये. विश्वास पाटील यांनी निवृत्त होताना शेवटच्या महिन्यात 137 फाईल्स क्लिअर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. विक्रोळीच्या हनुमाननगर एसआरए प्रकल्पातही त्यांचं नाव आलं. त्यानंतर मालाडच्या एका बिल्डरला फायदा करून दिल्याप्रकरणी त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यामुळे विश्वास पाटलांनी क्लिअर केलेल्या फाईल्सच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले.

प्रवीण परदेशी, प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रवीण परदेशी यांच्यावर विश्वास टाकला. पण त्यांच्यामुळेही मुख्यमंत्री अडचणीत आलेच. 2015 मध्ये प्रवीण परदेशींमुळे विमानाला उशीर झाला होता. नारायण राणेंनी सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय एक अधिकारी चालवत असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांचे कारभारी नेहमीच वादात सापडत असल्यानं मंत्री नव्हे तर अधिकारीच मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात असं पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2017 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...