सावधान, चंद्रभागेत स्नान करणे झाले धोकादायक !

सावधान, चंद्रभागेत स्नान करणे झाले धोकादायक !

आषाढीवारीला पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेत पुण्यस्नान करण्याची प्रथा आहे. पण यंदा तुम्ही चंद्रभागेत स्नान करणार असाल तर सावधान...चंद्रभागा आता धोकादायक झालीये.

  • Share this:

सुनील उंबरे, पंढरपूर

13 जून : आषाढीवारीला पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेत पुण्यस्नान करण्याची प्रथा आहे. पण यंदा तुम्ही चंद्रभागेत स्नान करणार असाल तर सावधान...चंद्रभागा आता धोकादायक झालीये.

पंढरपूरची चंद्रभागा नदी धोकादायक बनलीये. चंद्रभागा धोकादायक बनलीये वाळू माफियांमुळे...वाळूमाफियांनी नदीपात्रात खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन दिवसांपूर्वी चार मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं वाळूमाफियांनी चंद्रभागेचं पात्र किती धोकादायक बनवून ठेवलंय याची प्रचिती येते. ही मुलं जिथं बुडाली तो भाग अगदी पुंडलिकाच्या मंदिराशेजारी आहे.

आषाढी वारीचा सोहळा अगदी तोंडावर आलाय. त्यामुळे नदीपात्र भाविकांसाठीही धोकादायक झालंय.

चंद्रभागेच्या पात्रात होणाऱ्या बेसुमार वाळूउपशामागे अधिकारी आणि माफियांचं संगनमत असल्याचा आरोप होतोय. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होतेय.

आषाढी वारीच्या सोहळ्यात लाखो भाविक चंद्रभागेत स्नान करतात. त्यावेळी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय.

First Published: Jun 13, 2017 10:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading