• SPECIAL REPORT : 'प्रिन्सदादा'चा नायनाट कधी?

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 09:10 PM IST | Updated On: Dec 20, 2018 09:10 PM IST

    सिद्धार्थ गोदाम आणि सुरेश,बीड 20 डिसेंबर : बीडमध्ये जातीच्या खोट्या इभ्रतीसाठी पुन्हा एक जीव गेला. सैराटच्या दृष्यांनी सुन्न झालेल्या महाराष्ट्रात भररस्त्यातलं हे सैराट महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरचा काळा डाग आहे. पण बीडमधलं है सैराट होण्यापासून रोखता आलं असतं जर बीडच्या पोलिसांनी प्रिन्स दादाला वेळीच रोखलं असतं. इंजिनिअरिंगची परीक्षा देवून परतत असताना सुमित शिवाजी वाघमारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री वाघमारे यांच्यावर मोटार सायकलवर आलेल्या बालाजी लांडगे आणि त्यांच्या मित्रानं धारधार शस्त्रानं हल्ला केला यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. दोन महिन्यापूर्वी सुमित आणि भाग्यश्री यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र भाग्यश्रीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. यात बालाजी आणि सुमित याचं अगोदर भांडणही झालं होतं. याचाच राग मनात धरून परिक्षेसाठी आलेल्या सुमितवर बालाजीने कॉलेजच्या गेटवरच धारधार शस्त्रानं हल्ला केला. यात जखमी झालेल्या सुमितचा जागेवरच मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी