S M L

कर्जबाजारी 'बेस्ट'च 'चाक' खोलात

बेस्टला दिलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने धुडकावून लावलाय

Sachin Salve | Updated On: Apr 27, 2017 12:03 AM IST

कर्जबाजारी 'बेस्ट'च 'चाक' खोलात

मंगेश चिवटे, मुंबई

26 एप्रिल : आर्थिक अडचणीमध्ये बेस्टच आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बेस्टला दिलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने धुडकावून लावलाय. त्यामुळे बुडत्याच्या पाय खोलात अशी बेस्टची स्थिती झालीय. बेस्टच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणार हा एक स्पेशल रिपोर्ट...

बेस्ट हा मुंबई महापालिकेचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळे महापालिकेकडून बेस्टला वेळोवेळी आर्थिक मदत करण्यात येते. आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला 2013 साली महापालिकेकडून 1600 कोटी रुपयांचं कर्ज 10 टक्के व्याजदराने देण्यात आलं होतं. यापैकी जवळपास 800 कोटी रुपयांचं कर्जाचा बेस्टने परतावा केलाय. आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला मदत म्हणून उर्वरित 800 कोटी रुपयांवरील व्याजदर 5 टक्क्यांनी कमी करावा अशी मागणी बेस्टने केली होती. मात्र महापालिका प्रशासनाने हा धुडकावून लावल्याने आता आम्ही पुन्हा यासाठी नव्याने प्रयत्न करू अशी माहिती बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली.मात्र शिवसेना-भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळेच बेस्ट उपक्रम कर्जबाजारी झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केलाय.

बेस्ट ची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे

- सध्या बेस्ट वर 2100 कोटीचं कर्ज

Loading...

- राष्ट्रीयकृत बँकाच 1100 कोटी

- महापालिकेचं कर्ज 800 कोटी

- इतर बँका आणि संस्था कर्ज 200 कोटी

का आहे बेस्ट तोट्यात..?

- एकूण बसेस 3800, पण नियोजनाचा अभाव

- 520 मार्गांपैकी फक्त 4 मार्ग नफ्यात

- 275 मार्ग अतिशय तोट्यात

- AC बसेस तोट्यात चालवल्यामुळे 2010 ते 2017 दरम्यान एकूण 500 कोटींचा तोटा

 कशी फायद्यात येऊ शकते बेस्ट..??

- योग्य नियोजन

- बसेस च्या मार्गांची पुनर्रचना

- अतिशय तोट्यातील मार्ग बंद करणे

- बंद केलेल्या AC बसेस खाजगी कंपन्याना भाडेतत्वावर देणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 12:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close