स्पेशल रिपोर्ट : कटप्पा, बाहुबली आणि मध्यावधी !

स्पेशल रिपोर्ट : कटप्पा, बाहुबली आणि मध्यावधी !

जीएसटीचं अधिवेशन संपता संपता मुख्यमंत्र्यांच्या हातात कटप्पानं बाहुबलीला का मारलं ह्याचं उत्तर मिळालं नसल्याची चिठ्ठी आली आणि तिथेच राज्यातल्या बाहुबली अंकाची कदाचित सुरुवात झाली

  • Share this:

संदीप राजगोळकर-दिपक बोरसे, मुंबई

24 मे : बाहुबलीला एवढं मोठं यश का मिळालं असेल असा सर्वांनाच प्रश्न पडतो. त्याचं उत्तर गेल्या तीन चार दिवसात जे राज्यात राजकारण घडतंय त्याच्याकडं पाहिलं की नक्की मिळेल. कटप्पा, बाहुबली आणि मध्यावधीचा हा स्पेशल रिपोर्ट...

जीएसटीचं अधिवेशन संपता संपता मुख्यमंत्र्यांच्या हातात कटप्पानं बाहुबलीला का मारलं ह्याचं उत्तर मिळालं नसल्याची चिठ्ठी आली आणि तिथेच राज्यातल्या बाहुबली अंकाची कदाचित सुरुवात झाली. त्याच भाषणाच्या शेवटच्या दोन मिनिटात मुख्यमंत्री आणखी काय म्हणाले ते ऐका.

मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा विश्वास व्यक्त केला. खरा पण बाहुबली विरोधकांकडे झुकलेला आहे हे कदाचित मुख्यमंत्री विसरून गेले.

सगळ्यांना वाटलं चला सभागृहातला बाहुबलीचा अंक संपला, पण तसं असेल तर राजकारण कसं? 'बाहुबली'नं आता चक्क मध्यावधीचं भाकित केलंय. तेही मुख्यमंत्र्यांच्याच हवाल्यानं. यालाच म्हणतात बाहुबली पार्ट 2...

राज्यात मध्यावधी लागणार असतील तर त्या सेनेच्या भूमिकेशिवाय कशा लागतील? जसं विरोधकांनी बाहुबलीला गळ टाकलाय तसा सेनेलाही उठताबसता विरोधक चुचकारतात. जीएसटीच्या अधिवेशनाच्या त्या शेवटच्या दोन मिनिटात हे काय चाललं होतं.

बाहुबलीच्या ह्या अंकात आणखी एक वजनदार नेते आहेत. ते आहेत कोल्हापूरचे. त्यांच्या दिल्ली कनेक्शनमुळे खडसेंना फार बोलता येत नाही.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही कारण त्यांना वाटतं की पवार लगेच सरकारला पाठिंबा देऊन वाचवतील. तसं होणार नाही याची खात्री कुणीच देत नाही. पण एक गोष्ट निश्चित राज्यातल्या राजकारणातला बाहुबलीचा अंक अजून संपलेला नाही.

First published: May 24, 2017, 6:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading