'४९८ अ' पीडितांच्या काय आहे व्यथा ?

'४९८ अ' पीडितांच्या काय आहे व्यथा ?

सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा हुंड्यासाठी होणार छळ,पैशांची मागणी,मानसिक आणि शारीरिक छळ या सगळ्या बाबींचा अंतर्भाव हुंडाविरोधी कायद्यात होतो. या कायद्याला ४९८ अ म्हणून ओळखलं जातं.

  • Share this:

 हलिमा कुरेशी,पुणे

31 जुलै : g महिलांकडून या कायद्याचा दुरुपयोग करून सासरच्या मंडळींना त्रास दिला जात असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलीय. याबाबत आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

कायदा केवळ महिलांचा विचार करतं. पुरुषांवरील छळाच्या संदर्भात गांभीर्याने पाहिलं जात नाही. असा आरोप केला जातं असताना यापुढे  ४९८ अ अंतर्गत असलेल्या तक्रारींची शहानिशा करूनच अटक करण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय आणि या निर्णयाचं मेन्स राईट असोसिएशन सदस्यांनी स्वागत केलंय.

महिलांच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घ्यावा लागला. ४९८ अ लागल्यामुळे कोणीही नोकरी देत नाही, नोकरीवरून काढण्यात येत असल्याच्या तक्रारी मेन्स राईट असोसिएशनच्या सदस्त्यांनी केलीय.

कुठल्याही गुन्ह्यात पोलिसांनी सखोल चौकशी करूनच अटक कारण गरजेचं आहे. मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना या पुरुषांवरील अत्याचाराच्या तुलनेत कैक पटीने जास्त आहे.

स्त्री किंवा पुरुष दोघांवर अन्याय न होता ४९८ अ ची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. यात पोलीस यंत्रणा आणि वकिलांवर याची जबाबदारी मोठी आहे.

First published: July 31, 2017, 11:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading