स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेला गोंजारण्यात भाजपला यश येईल का ?

आगामी निवडणुकीत भाजपाला जशी शिवसेनेची गरज आहे, तशी सेनेलाही भाजपची हवी आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2018 08:43 PM IST

स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेला गोंजारण्यात भाजपला यश येईल का ?

प्रफुल्ल साळुंखे न्युज 18 लोकमत मुंबई

मुंबई, 08 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट झाली. भाजपला आगामी निवडणुकांसाठी एनडीएच्या घटकपक्षांची आवश्यकता भासतेय. पण गेल्या चार वर्षात दुखावलेल्या शिवसेनेला गोंजारण्यात भाजपाला यश येईल का ?

अफजलखानाची फौज ते दगाबाज या शब्दांपर्यंत शिवसेना भाजपानं एकमेकांवर तोडसुख घेतलं. राज्य मंत्रिमंडळ बैठक असो वा रस्त्यावर शिवसेना भाजपविरोधात नेहमीच आक्रमक राहिलीय. तर दुसरीकडे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही भाजपानं कधी सोडला नाही. अशा परिस्थितीत या दोन्ही पक्ष प्रमुख एकमेकांना भेटले. विशेषतः गेल्या निवडणुकीत उध्दव ठाकरेंशी चर्चा नाही,  अशा अर्विभावात असेलेले अमित शहा चक्क मातोश्रीवर भेटीला गेले.

या भेटीची पार्श्वभूमी  

- आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर नाही, भाजपा सूर

Loading...

- कैराना, उत्तर प्रदेशात सर्वपक्ष एकत्र आल्याचा भाजपाला फटका

- एनडीएच्या मित्रपक्षांची आवश्यकता

- मतविभाजणी टाळण्यावर भाजपाचा भर

- महाराष्ट्रातही सेनेसोबत युतीसाठी भाजप आग्रही  

ग्राफिक्स समाप्त

भाजपाला आगामी लोकसभा निवडणूक महत्वाची असली तरी शिवसेनेला राज्यातील सत्ता अत्यंत महत्वाची आहे. असं असताना मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली कोंडी हे शिवसेनेचं मोठं दुखणं आहे. यामुळेच स्वबळाचा नारा शिवसेनेनं लाऊन धरला.

शिवसेनेला खटकणाऱ्या बाबी  

- शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांचा अवाजवी हस्तक्षेप

- राज्यात मंत्रिमंडळात अधिकार नसलेले खाती

- मुख्यमंत्र्यांचा एकांगी कारभार

- शिवसेनेकडे केंद्रात आणि राज्यात भाजपनं केलेलं दुर्लक्ष

कदाचित म्हणूनच अमित शहांच्या मातोश्री भेटीनंतरही सेनेकडून स्वबळाचा पुनउच्चार करण्यात आलाय.

आगामी निवडणुकीत भाजपाला जशी शिवसेनेची गरज आहे, तशी सेनेलाही भाजपची हवी आहे. पण लोकसभा निवडणुकीत भाजपा जात्यात आहे तर सेना सुपात एवढाच काय तो फरक आहे..पाहुयात पुढे नेमकं काय होतंय ते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2018 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...