या' गावात नाही एसटी पण लागू आहे जीएसटी !

या' गावात नाही एसटी पण लागू आहे जीएसटी !

मेक इन इंडियाचं स्वप्न पाहणाऱ्या भारतात आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर आहे.

  • Share this:

 कुंदन जाधव, अकोला

08 नोव्हेंबर : डिजीटल इंडियाकडे वाटचाल करणारा ग्रामीण भारत, आजही विकासापासून कोसो दूर असल्याचं वास्तव आहे. अकोल्यातील वसाली गावचा हा स्पेशल रिपोर्ट..

अकोल्यातील पातूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेलं वसाली गाव हे अकोल्याच्या शेवटच्या टोकावरील बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या गावची लोकसंख्या बंजारा समाज आणि आदिवासी मिळून अवघी ४४५...म्हणून लोकप्रतिनिधी गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या गावानं आजपर्यंत एसटी ही पाहिलीच नाही मात्र जीएसटी ते अनुभवतायत.

गावात अजूनही फक्त चौथ्या इयत्तेपर्यंतचं शिक्षण आहे. आरोग्याची सुविधातर दूरचं..एकही दवाखाना नाही, डॉक्टरही नाही. एखादा गावकरी आजारी पडला तर त्यांना खासगी वाहनानं रूग्णालयात घेऊन जावं लागतं. शिवाय पाण्याची कुठलीच सुविधा नसल्याने गावामधून वाहणाऱ्या नदीतूनच गावकऱ्यांना पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी घ्यावं लागतं.

अत्याधुनिक सुविधांपासून वंचित असलेल्या या गावाला पुरातन वारसाही लाभला आहे. या ठिकाणी सीता न्हाणी आहेत. ज्यावेळी सितामाता वनवासात होत्या तेव्हा लव-कुश आणि सितामाता यांचं वास्तव्य याच ठिकाणी असल्याची आख्यायिका आहे.

मेक इन इंडियाचं स्वप्न पाहणाऱ्या भारतात आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 09:24 PM IST

ताज्या बातम्या