स्पेशल रिपोर्ट : 'आरे'चं साम्राज्य खालसा

स्पेशल रिपोर्ट : 'आरे'चं साम्राज्य खालसा

आरेचं एकेकाळी अधिराज्य होतं. पण गेल्या काही वर्षात आरेचं साम्राज्य पुरतं मोडकळीस आलेलं आहे.

  • Share this:

 रणधीर कांबळे, मुंबई

23 मे : मुंबईची दुधाची गरज 60 लाख लिटर आहे. एके काळी या शहराच्या दुध व्यवसायात आरेची पकड होती, पण आता या सरकारी कंपनीची स्थिती एवढी खराब आहे की आता दुध फक्त रूग्णालयांना देण्याचा निर्णय घ्यावा लागलाय. कारण आरेचा मार्केट शेअर आता फक्त 1 टक्के उरलाय.

आरे दुधाच्या बाटल्या आता आधी रुग्णालयांना पुरवल्या जाणार आहेत आणि मग दूध केंद्रावर त्या विक्रीसाठी जाणार आहेत. पूर्वी आरेच्या दुधाची बाटली मिळावी म्हणून लोक सकाळी रांगा लावून उभे असायचे पण आता आरेचा धंदा बसलाय. त्यामुळे सरकारला हा आदेश काढावा लागलाय.

'आरे'चं साम्राज्य खालसा

आरेकडे जमा होतं 30 हजार लिटर दूध

मुंबईतल्या रुग्णालयांना जातं 12 ते 13 हजार लिटर दूध

मुंबईची दुधाची गरज 60 लाख लिटर

खासगी कंपन्यांकडून 65 टक्के दूध वितरण

सहकारी दूध संस्थांकडून 35 टक्के दूध वितरण

आरेचा दूध वितरण एक टक्का

आरेचं दूध स्वस्त दरात मिळत असल्याने सरकारी रुग्णालय खुश आहेत, कारण त्यांना बाहेरचं महागडं दूध घ्यावं लागत नाही.

आरेचं एकेकाळी अधिराज्य होतं. पण गेल्या काही वर्षात आरेचं साम्राज्य पुरतं मोडकळीस आलेलं आहे. साडेचारलाख दूध वितरण करणारा कुर्ल्याचा प्लांट बंद झाला, तर 2 लाख लिटर दुध वितरणाचा प्लाँटही बंद आहे. आणि वरळीच्या प्लांटमधून फक्त 30 हजार लिटर दूध वितरीत होतंय. या प्लांटला नवसंजीवनी देण्याची गरज आहे आहे आणि त्यासाठी गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची.....

First published: May 23, 2017, 11:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading