S M L

ग्राउंड रिपोर्ट : कर्नाटक निवडणुकीत 'बदामी'ची चुरस का आहे खास ?

बदामी मतदारसंघात प्रचंड चुरस पाहायला मिळतेय, 3 तगडे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असून संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2018 11:23 PM IST

ग्राउंड रिपोर्ट : कर्नाटक निवडणुकीत 'बदामी'ची चुरस का आहे खास ?

संदीप राजगोळकर, कर्नाटक

30 एप्रिल : राजकारणामध्ये सोयीच आणि बेरजेचे राजकारण नेहमीच केलं जातं..सध्या कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या निमित्ताने बदामी मतदारसंघात प्रचंड चुरस पाहायला मिळतेय, 3 तगडे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असून संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे.

बदामी....बागलकोट जिल्ह्यातील एक मुख्य पर्यटन केंद्र...या भागात जितक्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात तितकाच जोरदार पाऊसही पडतो. महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ लेण्यांप्रमाणेच बदामी शहर प्रसिद्ध आहे इथल्या लेण्यांसाठी.. या शहरात एकूण चार मुख्य लेणी आहेत आणि ही लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक बदामीला भेट देत असतात आणि याच बदामीच्या मतदारसंघातील निवडणूक सध्या कर्नाटक राज्यात चर्चेची बनलेय.

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघातून अर्ज भरूनही पुन्हा त्यांनी बदामी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर त्यांच्याविरोधात भाजपकडून श्रीरामलू हे निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि जेडीएस कडून हनुमंत माविनमरद हे निवडणूक लढवत आहेत. तिनही उमेदवार तगडे असल्याने प्रचारामध्ये ही मोठी चुरस पाहायला मिळतेय पण मुख्यमंत्री बदामी मधून निवडणूक लढवणार असले तरी या मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारन दुर्लक्षच केलंय.

बदामी मतदार संघामध्ये धनगर समाजाची 51 हजार तर लिंगायत समाजाची 34 हजार मतं आहेत. नुकताच कर्नाटक राज्य सरकारने लिंगायत समाजाला धर्माची मान्यता दिल्यामुळे धनगर आणि लिंगायत समाजाची मतं एकत्र करून सिद्धरामय्या यांना विजय मिळेल असा विश्‍वास आहे. कारण ते स्वतः धनगर समाजाचे आहेत तर दुसरीकडे भाजपाचे श्रीरामलू हे वाल्मिकी समाजाचे आहेत तर जेडीएसचे हनुमंत माविनमरद हे लिंगायत समाजाचे आहेत परिणामी बदामीमधली ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाहीतर जातीच्याच राजकारणावर लढवली जात असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतंय.

Loading...
Loading...

भाजप उमेदवार श्रीरामलू यांच्यामागे बेल्लारीमधील रेड्डी बंधूंनी आपली ताकद उभी केली आहे तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बदामीमध्ये तळ ठोकून आहेत. त्याचबरोबर जेडीएसकडूनही जोरदार व्यूहरचना मतदारसंघामध्ये आखली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 11:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close