• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • स्पेशल रिपोर्ट : ...म्हणून भारताची जपानसोबत 'बुलेट मैत्री' !

स्पेशल रिपोर्ट : ...म्हणून भारताची जपानसोबत 'बुलेट मैत्री' !

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि जपानचे संबंध अधिक दृढ होत चालले आहेत. यामागे चीन हा मुख्य कारणांपैकी एक आहे.

  • Share this:
14 सप्टेंबर : गेल्या काही वर्षांपासून भारत आणि जपानचे संबंध अधिक दृढ होत चालले आहेत. यामागे चीन हा मुख्य कारणांपैकी एक आहे. याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट.. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विनाकारण काहीच होत नसतं. प्रत्येक मोठ्या धोरणामागे तगडी कारणं असतात. भारत आणि जपानचे संबंध अधिकाधिक दृढ होत चाललेत. गेल्या वर्षीचा भारत-जपान अणुकरार असो, किंवा आता बुलेट ट्रेनचं भूमिपूजन. या सगळ्यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे चीन. गेल्या 2 दशकांमध्ये चीनची ताकद कमालीची वाढल्यामुळे आशियामध्ये राजकीय असंतुलन निर्माण झालंय. आता हेच बघा, चीनचं संरक्षणविषयक बजेट आहे वर्षाला 216 अब्ज डॉलर्स. भारताचं हेच बजेट आहे 56 अब्ज डॉलर्स तर जपानचं 46 अब्ज डॉलर्स. म्हणजे भारत आणि जपानच्या संरक्षणविषयक बजेटची बेरीज केली, तर ती संख्या चीनच्या निम्म्याहूनही कमी. दुसरा मुद्दा अमेरिकेचा. 80 किंवा 90च्या दशकांमध्ये अमेरिकेला आशिया खंडात काय चाललंय यात भयंकर रस असायचा. पण आता परिस्थिती बदललीय. आम्हाला आमचे प्रश्न आधी सोडवू द्या, असं विधान ट्रम्प यांनी वारंवार केलंय. डोकलामचा विषय ताजा असतानाच, भारत किंवा जपानचा चीनशी संघर्ष वाढला, किंवा युद्ध झालं तर अमेरिका मदतीला धावून येईलच, याची खात्री सध्या तरी देता येत नाही. मग अशा परिस्थितीत, जवळ असलेल्यांशी मैत्री अधिक घट्ट करायची, हा साधा विचार. याव्यतिरिक्त, आर्थिक बाबीही यामागे आहेत. फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपानमधलं अणु क्षेत्र मरणासन्न झालंय. भारताच्या माध्यमातून त्यांना संजीवनी मिळू शकते. एकूणच काय, फोटो-बिटो सगळं ठीक आहे, पण त्यामागे सामरिक आणि व्यावहारिक कारणं आहेत, हे विसरता कामा नये.
First published: