कर्जमाफी देऊन मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात मारले अनेक पक्षी !

कर्जमाफी देऊन मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात मारले अनेक पक्षी !

शेतकऱ्यांना तत्वत: सरसकट कर्जमाफी देत, मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. हा फक्त शेतकरी आंदोलनाचा नाहीतर मुख्यमंत्र्यांचाही मोठा विजय आहे.

  • Share this:

12 जून : शेतकऱ्यांना तत्वत: सरसकट कर्जमाफी देत, मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. हा फक्त शेतकरी आंदोलनाचा नाहीतर मुख्यमंत्र्यांचाही मोठा विजय आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या एका घोषणेनं शेतकरी आंदोलनचा विजय झाला. पण काय हा फक्त शेतकऱ्यांचा विजय आहे.

शिवसेना...विरोधक...शेतकरीनेते सगळ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खिंडीत पकडलं होतं. भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांनी मिळवलेला विजय....दुपारपर्यंत पराभवात बदलला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालं

आता हा दोन दृष्यांवर नजर टाका....एका दृष्यात सरकार म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस दिसतायत. शेतकऱ्यांचे नेते म्हणून सदाभाऊ खोत आणि जयाजी सूर्यवंशी....आणि दुसऱ्या दृष्यात मुख्यमंत्री वगळून इतर मंत्री आणि शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टी बच्चू कडू...पहिल्या दृष्यात न दिसणारी शिवसेना....

ही दोन्ही दृष्य सर्व राजकीय पट उलगडणारी आहेत. कारण मध्यरात्री केलेल्या घोषणा आणि काल झालेल्या घोषणेत फारसा फरक नाही....फरक आहे तो फक्त...दुसऱ्या दृष्यात श्रेयाचे वाटेकरी वाढलेत.

पण एकाच दगडात मुख्यमंत्र्यांनी मात्र बरेच पक्षी मारलेत. नंबर एक शिवसेना त्यांच्याकडे आता विरोधासाठी मुद्दा उरलेला नाही.

मंत्रिगटात समावेश असल्यामुळे ते जबाबदारीही झटकू शकत नाही. बघता बघता स्वाभिमानीच्याही विरोधाची

धार काढून घेतलीये. तर भाजपमधल्याही नाराज गटाला संधी देऊन त्यांचाही विरोध मवाळ केलाय. आणि मध्य प्रदेशसारखं आंदोलनाला हिंसक वळण लागण्या अगोदर आंदोलन मिटवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलंय. आणि कालपर्यंत भाजपवर नाराज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिलाय.

काँग्रेस-राष्ट्रवादीला इच्छा असूनही यातून फारसा फायदा घेता आलेला नाही. श्रेय सोडा पण या निमित्तानं जिल्हा बँकांना अडचणीतून सोडवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्नही मुख्यमंत्र्यांनी हाणून पाडलाय. घोषणा करायला मुख्यमंत्री आले नाही. घोषणेनंतर २४ तास उलटूनही मुख्यमंत्र्यांनी साधा बाईटही दिला नाही. पण या सगळ्याचा त्यांना फायदा झाल्याचा दिसतोय. कारण सगळे श्रेय त्यांनाच मिळतंय. एकूण कालपर्यंत भाजप आणि सरकारच्या विरोधातली परिस्थिती...मुख्यमंत्र्यांनी बदलून पुन्हा एकदा स्टेअरिंगवर पकड मजबूत केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 09:51 PM IST

ताज्या बातम्या