डोंबिवली स्फोटातील नुकसानग्रस्तांना अजूनही भरपाई नाही !

डोंबिवली स्फोटातील नुकसानग्रस्तांना अजूनही भरपाई नाही !

स्फोटात नागरिकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान सुद्धा झाले होते. पण ते नुकसान अद्याप नागरिकांना मिळाले नाही.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली

24 एप्रिल : 26 मे 2016 रोजी डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला त्याला वर्ष होत आलंय. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक लोकं जखमी झाली होते. सदर स्फोटात नागरिकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान सुद्धा झाले होते. पण ते नुकसान अद्याप नागरिकांना मिळाले नाही.

नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत असलेले हे डोंबिवली स्फोटातील पीडित...या स्फोटाची दाहकता इतकी तीव्र होती की, जवळपासच्या अनेक इमारती, दुकानं यांचं मोठं नुकसान झालं. अनेकांना आपले व्यवसाय काही काळ बंद ठेवावे लागले. प्रोबेस कंपनीतल्या स्फोटाला आता वर्ष होत आलंय. नुकसान भरपाईसाठी इथले पंचनामे करण्यात आले, पंचनामे झाले, पण अजून नुकसान भरपाई काही मिळाली नाही.

दोन ते अडीच हजार पंचनामे करून सुद्धा राज्य सरकारने नुकसान भरपाईच्या नवावर एक छदामही लोकांना दिली नाहीये.  इतकंच नाही तर स्फोट झालेल्या प्रोबेस कंपनीच्या मालकानं आणखी एक कंपनी सुरू केलीय. या कंपनीत नेमकं केमिकल काय बनवलं जातं याची माहितीही सरकारनं लोकांपासून लपवून ठेवल्याचा आरोप केला जतोय. एका बाजूला लोकांना नुकसान भरपाई नाही आणि दुसऱ्या बाजुला या स्फोटाबद्दल काही माहितीही सांगितली जात नाहीये. अगदी माहितीच्या अधिकारातही प्रयत्न करुनही सामाजिक कार्यकर्ते माहितीविना हतबल आहेत.

सत्ताधारी मात्र नुकसान भरपाईचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचं ठामपणे सांगतंय.

डोंबिवलीला स्मार्ट सिटी करायचं असं ठरवणाऱ्या सरकारकडून अनेक प्रश्नाची उत्तरं हवी आहेत. प्रोबेस कंपनीच्या मालकावर काय कारवाई केली? आयुष्यभराचं अपंगत्व आलेल्याना पैशाव्यतिरिक्त रोजगाराची काही हमी दिली का?, एमआयडीसीतील अशा घातक रसायन निर्मितीवर काही बंधनं घातली का?, शेवटचा महत्वाचा प्रश्न की माहिती अधिकारासरखा अधिकार सरकार पायदळी का तुडवतंय?

First published: April 24, 2017, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading