S M L

तुर्रेबाज कोंबड्याची शाही बडदास्त

शहरात पंचतारांकित सोसायट्यांमध्ये कोंबडा पाळणारं हे कुटुंब आणि त्यांच्या कोंबड्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2017 08:10 PM IST

तुर्रेबाज कोंबड्याची शाही बडदास्त

रोहिदास गाडगे, 25 जून: कोंबडा म्हटलं की अनेकांना चमचमीत चिकन रस्सा आठवतो. मात्र  राजगुरुनगर मधलं एक कुटुंब, चक्क  एका कोंबड्याच्या प्रेमात पडलंय. घरात कोंबड्या असणं हे ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेष बाब नाहीच पण शहरात पंचतारांकित सोसायट्यांमध्ये कोंबडा पाळणारं हे  कुटुंब आणि त्यांच्या  कोंबड्याची  सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

खणखणीत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात बांग देत, आपल्या डोलदार झपकेबाज लाल भडक तुर्रा आणि शुभ्र रंगातील एेटील्या चालीकडे लक्ष वेधून घेणारा हा कोंबडा,राजगुरुनगरमधील सोनावणे कुटुंबातील एक सदस्य बनला आहे , खरं तर कोंबडा हा अनेकांसाठी  चवीनं खाल्ला जाणारा पक्षी आहे. मात्र सोनावणे कुटुंबियांकडून ह्या कोंबड्याची ठेवली गेलेली बडदास्त एखाद्या कथेतील कोंबड्याच्या राजाप्रमाणे आहे.

आपल्या घरात पाळले जाणारे प्राणी किंवा पक्षी त्यांच्या अशा ओरडण्यामुळे  शेजाऱ्यांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतात .मात्र, सोनवणेचा हा कोंबडा ,शेजाऱ्यांसाठी आरोग्य शिक्षक  बनलाय आहे आणि त्यामुळे तेही आता कुतूहलापलीकडे जाऊन, ह्या कोंबड्याला जीव लावतात .कुकूच कु ,कोंबड़ा कु ,

चिऊ चिऊ ये ,

काऊ काऊ ये .

Loading...

ही बालगीतं तर कधीच नाहीशी झालीयत , पण बालगीतातल्या कोंबड्याची अशी बडदास्त ठेवली जातेय हेही नसे थोडके.

ज्या काळात लोकांना घरातल्या माणसांना जीव लावणं शक्य होत नाहीय किंवा लावला जात नाहीय त्याकाळात कोंबड्याला जीव लावणारं सोनवणे कुटुंब विरळाच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 08:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close