धाडस लागतं !, जन्मताच मृत बाळाचा मृतदेह प्रयोगशाळेला दान

धाडस लागतं !, जन्मताच मृत बाळाचा मृतदेह प्रयोगशाळेला दान

सोलापुरातील युनिक हॉस्पिटलमध्ये अनुश्रीच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाच्या हृदयाची वाढ न झाल्यानं ते पोटातच दगावले.

  • Share this:

23 फेब्रुवारी : नऊ महिने पोटात वाढवलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याचा जन्मताच मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार न करता त्या चिमुकलीचा मृतदेह प्रयोगशाळेला दान करण्याचा निर्णय सोलापुरातल्या एका दाम्पत्यानं घेतलाय. आई अनुश्री आणि वडील प्रसाद मोहिते असं या दाम्पत्याचं नाव आहे.

सोलापुरातील युनिक हॉस्पिटलमध्ये अनुश्रीच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाच्या हृदयाची वाढ न झाल्यानं ते पोटातच दगावले. अनू आणि प्रसादला आठव्या महिन्यात त्यांच्या बाळाच्या हृदयाचा विकास झालेला नाही आणि बाळ जन्माला आल्यानंतरही जास्त दिवस जगणार नाही याची कल्पना रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आधीच दिली होती.

त्यानंतर या दाम्पत्याने काही वेळाच्या चर्चेनंतर देहदान करण्याचा निर्णय घेतला.  तिच्या देहावर संशोधन करून भविष्यकाळात इतर बाळांना'तिचा'नक्कीच उपयोग होईल अशी मन हेलावून टाकणारी भावना बाळाला जन्म देणाऱ्या आई अनुश्री आणि वडील प्रसाद मोहिते यांनी व्यक्त केलीये.

वंचितांची शाळा चालवणाऱ्या या दाम्पत्याने आपल्या बाळाचा समाजासाठीही वाटा व्हावा यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागेल.

First published: February 23, 2018, 11:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading