07 डिसेंबर : ज्या वयात मुलं खेळणी आणि व्हिडिओ गेम्समध्ये रमतात त्याच वयात 'ती' गुन्हेगारी दुनियेचा शोध घेतेय आणि त्यांची रहस्य सोडवतेय. ही लहान मूर्ती दुसरी तिसरी कुणी नसून 'ती एका वृत्तपत्राची संपादक आहे...नाव आहे संपादक 'हिल्डे काटे लायसियाक' (Hilde Kate Lysiak).
हिल्डे वयाच्या 9 वर्षापासून रिपोर्टिंग करतेय. तिने पत्रकारितेचा हा वारसा तिच्या वडिलांकडून म्हणजेच मॅथ्यू लायसियाक यांच्याकडून घेतला आहे. मॅथ्यू हे अमेरिकेतील प्रसिद्ध पत्रकार आहेत. ते 'न्यूयॉर्क डेली न्यूज' या वृत्तपत्रात काम करायचे. ते कामावर जाताना हिल्डेलाही सोबत घेऊन जायचे आणि यातूनच ती पत्रकारिता शिकली. कोणत्या बातम्या महत्त्वाच्या आहेत, बातमीचा खोलवर अभ्यास कसा करायचा हे सगळं ती अगदी लहान वयातच शिकली आणि यामुळेच हिल्डे अवघ्या 11व्या वर्षीच पत्रकारितेत आली.
पत्रकारितेचं बाळकडू तिला वडिलांकडून मिळालं त्यामुळे तिला पत्रकारितेत आवड निर्माण झाली होती आणि त्याच दरम्यान तिच्या वडिलांनी पत्रकारिता सोडण्याचा विचार केला तेव्हा तिला खूपच धक्का बसला. पण हिल्डे थांबली नाही. तिच्या वडिलांनंतर स्वत:हाचं वृत्तपत्र सुरू करण्याचा तिनं विचार केला आणि तिला परवानगीही मिळाली.
हिल्डेने स्वत:चं 'ऑरेंज स्ट्रिट न्यूज' हे लोकल वृत्तपत्र सुरू केलं.
बरं इतकंच नाही तर बातम्या गोळा करण्यासाठी हिल्डे रोज सायकलवर सगळीकडे फिरते. आता तुम्ही म्हणालं ती शाळेत जातं नाही का ? तर हिल्डे घरीच अभ्यास करते, कारण तिला जास्त वेळ वृत्तपत्रासाठी द्यावे लागतो. वृत्तपत्रासाठी ती क्राईम, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम अशा बातम्या गोळा करते.
हिल्डेला प्रसिद्धी तेव्हा मिळाली जेव्हा तिने एक हत्येची बातमी केली आणि सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे गेलं. तिने हत्या, शाळांमध्ये चालणाऱ्या ड्रग्स रॅकेटसारख्या विविध बातम्या विशेष रिपोर्टिंग केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा