सेनेची आणखी एक खेळी,आता राष्ट्रपतीपदासाठी स्वामिनाथन यांचं नाव पुढे !

सेनेची आणखी एक खेळी,आता राष्ट्रपतीपदासाठी स्वामिनाथन यांचं नाव पुढे !

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असताना शिवसेनेनं आता कृषीतज्ज्ञ स्वामिनाथन यांचं नाव पुढं केलंय. शिवसेनेनं भागवत यांच्या सोबतीला स्वामीनाथन यांचं नाव पुढं करून आणखीन एक खेळी केलीये.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई

16 जून : राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असताना शिवसेनेनं आता कृषीतज्ज्ञ स्वामिनाथन यांचं नाव पुढं केलंय. शिवसेनेनं भागवत यांच्या सोबतीला स्वामीनाथन यांचं नाव पुढं करून आणखीन एक खेळी केलीये.

भाजपप्रणित एनडीए सरकारकडून राष्ट्रपतिपदासाठी वेगवेगळ्या उमेदवारांची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं आता आणखी एक नाव पुढं केलंय. राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेनं कृषीतज्ज्ञ एम एस स्वामिनाथन यांचं नाव पुढं केलंय. शिवसेनेनं पहिल्यांदा सरसंघचालक मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपतिपदासाठी योग्य असेल असं सांगितलं होतं. स्वतः मोहन भागवतांनी याचा इन्कार केलेला असतानाही शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा आग्रह कायम आहे. आता भागवत नाही तर स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करा अशी भूमिका शिवसेनेनं मांडलीये.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शेतकरीभिमूख भूमिका घेतेय. स्वामिनाथन यांचं शेतीसाठीचं योगदान पाहता त्यांनी हे नवं नाव पुढं केलंय. भाजपनं शिवसेनेनं सुचवलेल्या दोन्ही नावांवर फुली मारल्यास भाजप हिंदूविरोधी आणि शेतकरी विरोधी आहे अशी भूमिका मांडायला शिवसेनेला मार्ग मोकळा राहणार आहे.

शिवसेना या दोन्ही नावांव्यतिरिक्त आणखी कोणतं नाव सुचवणार का असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी तिरकस टोला लगावलाय.

अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीला येतायेत. त्याअगोदरच शिवसेनेनं आपली दोन नावं ठरवून ठेवलेली आहेत. भाजप या दोन नावांवर जवळपास फुल्ली मारतील हे निश्चित आहे. तसंच झालं तर शिवसेना आपल्या सोईची भूमिका घेण्यासाठी मोकळी राहणार आहे.

कोण आहे एम एस स्वामिनाथन ?

- एम एस स्वामिनाथन

- जन्म - 7 ऑगस्ट 1925

- तामिळनाडूतील कुंबाकोणममध्ये झाला जन्म

- गरीब शेतकरी कुटुंबात झाला जन्म

- हरित क्रांतीमध्ये त्यांचे मोठे योगदान

- 1972 ते 1979 - केंद्रीय कृषी विभागाचे संचालक

- 1979 ते 1980 - कृषीमंत्रालयाचे प्रधान सचिव

- फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राचे महासंचालक

- १९८९ पासून चेन्नईमधील एम. एस. स्वामिनाथन संशोधन संस्थेचे अध्यक्ष

- २००४ - राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष

- पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषणने सन्मानित

- झेकोस्लाव्हाकियातील मेंडेल मेमोरियल पदक

- सामूहिक नेतृत्वासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार

- डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर २00४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना

First published: June 16, 2017, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading