'शिवसंपर्क'चा फज्जा उडाल्यानंतर सेनेचं आता 'मी कर्जमुक्त होणारच अभियान'

'शिवसंपर्क'चा फज्जा उडाल्यानंतर सेनेचं आता 'मी कर्जमुक्त होणारच अभियान'

याच मोहिमेचाच दुसरा टप्पा 'मी कर्जमुक्त होणारच' अशी एकदिवसीय कार्यशाळा 19 मे रोजी नाशिकमध्ये होणार आहे.

  • Share this:

उदय जाधव आणि मंगेश चिवटे, मुंबई.

13 मे : मराठवाड्यातील शिवसनेच्या शिवसंपर्क अभियानात, 40 पैकी 27 आमदारांनी दांडी मारल्यामुळे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेला खो घालण्याचा प्रयत्नं काही आमदारांनी केला. याच मोहिमेचाच दुसरा टप्पा 'मी कर्जमुक्त होणारच' अशी एकदिवसीय कार्यशाळा 19 मे रोजी नाशिकमध्ये होणार आहे. या कार्यशाळेत दिवसभर कृषीतज्ञ आणि अर्थतज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आधीच मराठवाड्यातल्या शिवसंपर्क अभियानाला शिवसनेच्याच आमदारांनी हरताळ फासल्यामुळे, आता शिवसनेच्या दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

शिवसंपर्क अभियानाला दांडी मारणारे शिवसनेचे आमदार, आता आपण का दांडी मारली याची सारवासारव करताना दिसत आहेत. कुणी आजारी होतं. तर कुणाच्या घरी कोटुंबिक कार्यक्रम होते. मात्र 27 आमदारांना या ना त्या कारणाने अभियानात जाणं शक्य झालं नाही हे मात्र पचनी पडत नाहीये. काही आजी-माजी नगरसेवकही या अभियानात सहभागी झाले होते. मात्र नगरसेवकांना बळीराजाचे प्रश्नं मांडण्याचा अधिकारच नाहीये.

याचाच अर्थ शिवसंपर्क असं नाव असलेल्या शिवसेनेच्या अभियान मोहिमेत, कुणाचाच कुणाला संपर्क नाहीये. आमदारांना नगरसेवक माहीत नाही. तर आमदारांच्या ठिकाणी नगरसेवकांची ओळख करून द्यावी लागतेय. त्यामुळे शिवसनेला पक्षातील संपर्क वाढवण्याची गरज आहे. नाहीतर उद्धव ठाकरेंना राज्यातील सर्व नगरसेवक आणि आमदरांचीच, एकमेकांना संपर्क करुन देण्यासाठी, कार्यशाळा आयोजित करण्याची वेळ येईल.

First published: May 13, 2017, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading