शिवनेरी गडावर शिवप्रेमींनी तावडे-पंकजा मुंडेंना घेरलं,' भाजप सरकार हाय हाय'च्या घोषणा

शिवनेरी गडावर शिवप्रेमींनी तावडे-पंकजा मुंडेंना घेरलं,' भाजप सरकार हाय हाय'च्या घोषणा

या वेळी शिवप्रेमींनी व्हीआयपी संस्कृती बंद करण्याची मागणी केली.

  • Share this:

19 फेब्रुवारी : शिवनेरी गडावर संतप्त शिवप्रेमींच्या रोषाचा  राज्याचे सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सामना करावा लागला. त्यांच्या उपस्थितीतच शिवप्रेमींनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमीना गडावरती जाणाऱ्यांसाठी सकाळच्या सत्रात पोलिसांनी रोखल्याने संतप्त शिवप्रेमींनी गडावरून खाली उतरत असताना राज्याचे सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना आडवत 'भाजप सरकार हाय हाय'च्या निषेधार्थ घोषणा दिल्यात. या वेळी शिवप्रेमींनी व्हीआयपी संस्कृती बंद करण्याची मागणी केली.

ज्या शिवप्रेमींकडे पास आहेत त्यांनाच गडावर सोडण्यात येत असल्याने हजारो शिवभक्तांना गडाच्या पायथ्या वरूनच माघारी जावे लागले. त्यामुळे या शिवभक्तांना राग अनावरण झाल्याने त्यांनी मंत्र्यांना रोखले.

First Published: Feb 19, 2018 10:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading