एसीपी प्रद्द्युम्न बनलेत पारसीबाबा!

एसीपी प्रद्द्युम्न बनलेत पारसीबाबा!

नेहमी दया तोड दो ये दरवाजा म्हणणारे शिवाजी साटम आता आपल्याशी बोलायला येणार आहेत पारसी भाषेत. 'मी शिवाजी पार्क' या सिनेमात त्यांनी पारसीबाबा साकारलाय.

  • Share this:

मुंबई, 7 आॅक्टोबर : नेहमी दया तोड दो ये दरवाजा म्हणणारे शिवाजी साटम आता आपल्याशी बोलायला येणार आहेत पारसी भाषेत. 'मी शिवाजी पार्क' या सिनेमात त्यांनी पारसीबाबा साकारलाय. खरं तर शिवाजी साटम फार मोजके सिनेमे निवडतात. त्यानिमित्तानं त्यांनी आमच्याशी संवाद साधला.

'महेश माझा जुना मित्र. त्यानं मला सिनेमाबद्दल विचारलं तेव्हा मी फक्त त्याला तारखांबद्दल विचारलं. भूमिका कुठली वगैरे प्रश्न नाही विचारले,' शिवाजी साटम सांगतात. 'महेशनं आतापर्यंत मला तगड्या भूमिकाच दिल्यात. त्यामुळे मी तो सिनेमा डोळे मिटून स्वीकारला.' ते सांगतात.

त्यांना गुजराती-पारसी चांगलं बोलता येतं. पारसी लोकांच्याच बँकेत त्यांनी नोकरी केलीय. त्याचा फायदा नक्कीच त्यांना झाला. साटम सांगतात, 'मला घाटी पारसी म्हणायचे सगळे जण.'

या सिनेमात त्यांनी गाणंही म्हटलंय.‘मी शिवाजी पार्क’ हा सिनेमा वर्तमानकाळात घडणाऱ्या वास्तव घटनेवर प्रकाश टाकणारा असल्याने अशा प्रकारचं विडंबनात्मक काव्य करण्याची कल्पना सुचली आणि ‘भरवसा हाय काय’ हे गाणं या चित्रपटात आल्याचं मांजरेकर सांगतात. या चित्रपटात पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट आहे. या प्रत्येक अभिनेत्याच्या आवाजाची वेगळी ओळख आहे.

शिवाजी साटम म्हणाले, ' हे गाणं खूप धमाल आहे. रेल्वेच्या डब्यातलं हे गाणं आहे. हे ज्येष्ठ नागरिक असलेले पाच मित्र पिकनिकला निघालेत. त्यावेळी ते हे गाणं म्हणतात.' गाणं शूट करताना, ते गाताना खूप मजा केली, असंही ते म्हणाले.

साटम आजही शूटिंग करताना आनंद घेतात. ते म्हणाले, 'माझं मन मराठी माणसाचं आहे. मध्यमवर्गीय व्हॅल्यू मी जोपासतो. म्हणून खूश राहतो. मराठी माणसाचं मन कोणाकडे नाही. त्याच्या चांगुलपणाचा फायदा सर्वजण घेतात.'

डाॅ. सलील कुलकर्णींच्या 'वेडिंगचा शिनेमा' या सिनेमात शिवाजी साटम यांची भूमिका आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, ' हाही मध्यमवर्गाच्या व्हॅल्यूंवरचा सिनेमा आहे. गोड संसाराची गोष्ट आहे. सुनील बर्वे, मुक्ता बर्वे आणि अलका कुबल आठल्ये यांच्या सिनेमात भूमिका आहेत.' त्यांनी सिनेमाची माहिती दिली. त्याचं शूटिंग आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल.

मी शिवाजी पार्कमध्येही अभिजीत साटम, मधुरा गोखले साटम असं साटम कुटुंबच आहे. येत्या दसऱ्याला हा चित्रपट रिलीज होतोय. या रहस्यमय चित्रपटाबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.

तुझा पोलिसांवर भरोसा हाय काय, म्हणत महेश मांजरेकरांनी केला कल्ला!

First published: October 7, 2018, 1:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading