'शिवरायांचा इतिहास चुकीचा होता तर, तो दुरुस्त का झाला नाही ?'

'शिवरायांचा इतिहास चुकीचा होता तर, तो दुरुस्त का झाला नाही ?'

शिवाजी महाराज हे मुस्लिमविरोधी नव्हतेच हा इतिहास आहे. पण मग राज्यकर्त्यांनी तशी प्रतिमा का होऊ दिली याचं उत्तर का मिळत नाही?

  • Share this:

अद्वैत मेहता,पुणे

21 जून : इतिहास हा भावी पिढ्यांना ऊर्जा देत असतो दिशा देतो पण तो इतिहासच चुकीचा असेल तर? हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे ते पुण्यात शरद पवारांनी श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाच्याविमोचन प्रसंगी केलेलं भाषण...

पवारांनी काही पहिल्यांदा असं वक्तव्य केलेलं नाही. पण इतिहास खरंच एवढा चुकीचा होता तर पन्नास वर्षे राजकारणात सर्वोच्च पदावर असणाऱ्या पवारांनी तो दुरूस्त करण्याचा का प्रयत्न केला नाही असा सवालही उपस्थित होतो. शिवाजी महाराज हे मुस्लिमविरोधी नव्हतेच हा इतिहास आहे. पण मग राज्यकर्त्यांनी तशी प्रतिमा का होऊ दिली याचं उत्तर का मिळत नाही?

खुद्द शरद पवारांवर जातीय राजकारणाचा आरोप होत आलाय. राष्ट्रवादीचा बेसही मराठा मतांचा राहीलाय. अलिकडच्या काळात ब्राम्हणविरूद्ध मराठा असा संघर्षही पाहायला मिळतो. पुण्यात अलिकडे त्याचं प्रमाण वाढलाय. त्यापार्श्वभूमीवर पवारांच्या टीकेला महत्व आहे.

इतिहास हा संशोधनावरच लिहिला गेला पाहिजे आणि त्यात चुका सुधारण्याचाही वाव असला पाहिजे. पण नव्यानं इतिहास लिहिण्याच्या नादात खरा इतिहासही पुसला जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. राज्यकर्तेही त्याचं भान ठेवतील अशी अपेक्षा करूया..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 11:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...