S M L

सायलीला गरज आहे तुमच्या मदतीची, न्यूज18लोकमतची मोहीम

पिंपरी चिंचवड शहरातील एका तरुणीला, अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलंय. त्यामुळे मृत्यू, तिच्या समोर उभा आहे. मात्र असं असून देखील, उभ्या असलेल्या मृत्यूकडे दुर्लक्ष करत ,ती आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं स्वप्न बघतेय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 29, 2018 09:33 PM IST

सायलीला गरज आहे तुमच्या मदतीची, न्यूज18लोकमतची मोहीम

गोविंद वाकडे, 29 मार्च : पिंपरी चिंचवड शहरातील एका तरुणीला, अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलंय. त्यामुळे मृत्यू, तिच्या समोर उभा आहे. मात्र असं असून देखील, उभ्या असलेल्या मृत्यूकडे दुर्लक्ष करत ,ती आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं स्वप्न बघतेय. त्यासाठी तिला गरज आहे तुमच्या मदतीची.

मित्र आणि आप्तेष्टांकडून पैशांची जुळवा जुळव करणारे, हे आहेत ,सायली गजभिव ह्या अत्यंत गोड मुलीचे वडील.आपल्या एकुलत्या मुलीला झालेल्या, एका दुर्धर आजारामुळे त्यांना तिचं फ़ुफ़ुस आणि हृदय एकाच वेळी बदलावं लागणार आहे, आणि त्यासाठी तब्बल पस्तीस लाख रूपये ख़र्च येणाराय. मध्यमवर्गीय असलेल्या ह्या कुटुंबाला एवढी रक्कम जमवणं केवळ अशक्य असल्यान, हे सगळेचजणं एकत्र येऊन, सायलीला वाचवा अशी भावनिक साद घालतायत.

आपल्याला आपल्या मृत्यूची वेळ कळणं ही आयुष्यातील सर्वात धक्कादायक बाब असते, प्रायमरी प्लमनरी हायपरटेंशन ह्या अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलेल्या सायली गजभिव ह्या तरुणीलाही तिच्या मृत्यूची तारीख कळविण्यात आलीय, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत, सायलीने जगण्याची उमेद आणि आपल स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द कायम ठेवलीय.

सायली सध्या चेन्नई मधील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये उपचार घेतीय,तिथे तीच हृदय आणि फ़ुफ़ुसही बदलली जाणार आहेत.मायबाप म्हणावणारं शासन आणि लोकप्रतिनिधीं कडून  केवळ "बेटी बचाओ -बेटी पढ़ाओ" च्या केवळ घोषणा दिल्या जातायत, प्रत्यक्ष कृती मात्र काहीच होत नाही.आणि त्यामुळे अश्या कठीण प्रसंगी समाज म्हणून सायलीची ही स्माईल आणि स्वप्न आपल्यालाच आबाधित ठेवायचीयत .अर्थात आर्थिक मदतीशिवाय ते शक्य होणार नाही .आणि म्हणून आपण पुढे या आपल्या सायलीसाठी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2018 06:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close