वय 75 वर्षं, नऊ सेकंदात 50 मीटर पार, असे आहे साताऱ्याचे 'उसेन बोल्ट'

वय 75 वर्षं, नऊ सेकंदात 50 मीटर पार, असे आहे साताऱ्याचे 'उसेन बोल्ट'

वाऱ्याशी स्पर्धा करणारे म्हसवडचे मुसा दादूभाई मुल्ला...वयाच्या पंचाहत्तरीत असलेल्या मुल्ला ५० मीटरचं अंतर चक्क ९ सेकंदात पार करतात.

  • Share this:

तुषार तपासे, सातारा

27 मार्च : वय वर्ष 75 वर्षाचा माणूस आजोबा होतो...शरीर थकतं...तो सगळ्यातून निवृत्त होतो...पण 75 वर्षांचे आजोबा जर 50 मीटर अंतर अवघ्या 9 सेकंदात पूर्ण करत असतील तर त्यांना उसेन बोल्ट म्हणू नये तर काय म्हणावं...न्यूज18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट...

वाऱ्याशी स्पर्धा करणारे म्हसवडचे मुसा दादूभाई मुल्ला...वयाच्या पंचाहत्तरीत असलेल्या मुल्ला ५० मीटरचं अंतर चक्क ९ सेकंदात पार करतात.त्यांच्या या अनोख्या कामगिरीमुळे त्यांना मानदेशातील उसेन बोल्ट म्हणून ओळखलं जातं..

पळण्याच्या आधी मुसाभाई थोडा व्यायाम करतात...मग त्यांना प्रेरणा देण्यासाठी गावातील लोक जमतात...मग सुरू होते एक वाऱ्याशी अनोखी स्पर्धा...

मुसाभाई यांच्या अंगात उपजतच वेगाने धावण्याचे कौशल्य होते. मात्र, त्यांच्या धावण्याचा सरावाकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. जी मंडळी त्यांच्या या सरावावर टीका करायची तीच आता त्यांचं कौतुक करताना दिसतायत.

माण तालुका बाजार समितीत नोकरी करणारे मुसाभाई आता सेवानिवृत्त झाले आहेत. मुलगा इम्रानला देखील पहिल्यांदा हा वडिलांचा धावण्याचा प्रकार विचित्र वाटायचं पण आता तोच आता त्यांना प्रोत्साहन देतोय.

पंचाहत्तरीत असलेले मुसाभाई रोज माण नदी किनारी असणाऱ्या बायपास रस्त्यावर व्यायाम आणि नियमित धावण्याचा सराव करतात. सध्या त्यांच्या धावण्याचं आणि रेकॉर्डब्रेक वेळेचे विशेष कौतुक होत आहे.

First published: March 27, 2018, 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading