S M L

सुनेबरोबर गायीचंही डोहाळे जेवण,साताऱ्यातील लावंड कुटुंबियांचा आदर्श

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2018 07:17 PM IST

सुनेबरोबर गायीचंही डोहाळे जेवण,साताऱ्यातील लावंड कुटुंबियांचा आदर्श

08 जानेवारी : पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस गर्भवतीचं डोहाळे जेवण करणं यात नवीन काहीच नाही पण आपल्या सुनेबरोबरच पोटच्या पोरीप्रमाणे माया लावणाऱ्या गायीचंही डोहाळे जेवण करणं यात नक्कीच नवीन आहे.

रण साताऱ्यातील खातगुण गावातल्या धनंजय लावंड कुटंबानं त्यांच्या सुनेच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात त्यांची गाय कावेरीचंही डोहाळे जेवण केलं.

कावेरीचीही साडी आणि हार घालून ओटी भरण्यात आली. तिला गोडधोड खाऊ घालण्यात आलं, तिचं औक्षणही करण्यात आलं. विशेष म्हणजे गावातल्या इतर गायींनाही कावरीच्या डोहाळजेवणासाठी विशेष आमंत्रण होतं. गायींचं महत्त्व समजावं यासाठी हे डोहाळजेवण केल्याचं लावंड कुटुंबियानी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close