S M L
Football World Cup 2018

गोष्ट एका 'मोरांच्या आईची' !

गेली 12 वर्ष साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर ललिता केशव यांनी छोट्यासा संसार थाटलाय आणि हा संसार आहे मोर आणि पक्ष्यांचा...

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2017 09:52 PM IST

गोष्ट एका 'मोरांच्या आईची' !

तुषार तपासे, सातारा

25 नोव्हेंबर : वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जंगले कमी होऊ लागल्याने पशुपक्षाचं जीवन धोक्यात आलंय. अशातच साताऱ्यातील एक सामान्य महिला ललिता केशव या मोरांच्या आई म्हणून ओळखल्या जातात.

या आहेत 'मोरांच्या आई'...गेली 12 वर्ष साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर ललिता केशव यांनी छोट्यासा संसार थाटलाय आणि हा संसार आहे मोर आणि पक्ष्यांचा...आणि ललिता आहेत त्यांच्या आई...ललिता केशव या गेले अनेक वर्ष अजिंक्यतारा किल्ल्यावर मोर आणि पक्षांचं संगोपन करतायेत. रोज सकाळी घरातील कामं झाली की एक पाण्याता हंडा आणि धान्याची पिशवी घेऊन त्या किल्ल्यावर येतात.

ललिता यांच्या या कामात त्यांचं पती आणि सातारकर नेहमी साथ देतात.या किल्ल्यावर एका तलावाची मागणी ललिता यांनी केलंय.

ललिताताई यांची प्रेरणा घेऊन निसर्गाला आपणही काही देणं लागतो हे लक्षात घेऊन प्रत्येकाने निसर्गाच्या संवर्धनासाठी काही तरी करणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 09:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close