News18 Lokmat

क्लर्क 15 तर शिपाई 10 लाख, सातारा जिल्हा बँकेत कर्मचारी भरती घोटाळा ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 12:02 AM IST

क्लर्क 15 तर शिपाई 10 लाख, सातारा जिल्हा बँकेत कर्मचारी भरती घोटाळा ?

 तुषार तपासे, मंगेश चिवटे, मुंबई.

28 जुलै : सातारा जिल्हा बँकेत कर्मचारी भरती घोटाळ्याचा आरोप झालाय. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदारच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात एक विशेष रिपोर्ट.

क्लर्क- 14 ते 15 लाख

शिपाई- 8 ते 10 लाख  

हा भाव आहे सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचारी भरतीचा...सातारा जिल्हा बँकेत 376 जणांच्या भरतीत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप होतोय. ज्यांनी परीक्षा दिलीच नाही त्यांनाही परीक्षेत उत्तीर्ण दाखवून नोकरी दिली. याची कागदपत्रं समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने या भरतीला स्थगिती दिलीये. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे आणि इतर संचालकांचा या भरती घोटाळ्यात हात असल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी केलाय.

Loading...

भरती घोटाळ्याचे आरोप राजकीय सूडबुद्धीनं केल्याचा प्रतिवाद आमदार शिवेंद्रराजेंनी केलाय. कोर्टाच्या आदेशानुसार सातारा जिल्हा बँक चौकशीसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.

साताऱ्यासारख्या अनेक DCC बँकांत कर्मचारी भरतीत राजरोसपणे घोटाळा होतोय. सहकार मंत्री आणि मुख्यमंत्री अशा बँकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार की राज्यकर्त्यांच काम पुन्हा न्यायालय करणार हेच पाहायचं..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 12:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...