VIDEO : स्वत:च्या लग्नातही नाचले होते संजीव श्रीवास्तव, गोविंदा स्टाईल डान्सरची कहाणी

VIDEO : स्वत:च्या लग्नातही नाचले होते संजीव श्रीवास्तव, गोविंदा स्टाईल डान्सरची कहाणी

  • Share this:

भोपाळ, 01 जून : सध्या सोशल मीडियावर गोविंदा स्टाईल डान्स करणारे संजीव श्रीवास्तव रातोरातो स्टार झालेय. देशभरात त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला जातोय आणि शेअर केला जातोय. न्यूज18 ने संजीव श्रीवास्तव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कहाणी जाणून घेतली.

भोपाळचे राहणारे संजीव श्रीवास्तव हे पेशाने प्राध्यापक आहे. भोपाळच्या भाभा रिसर्च संस्थानमध्ये ते शिकवतात. ते विदिशा इथं राहतात आणि त्यांना प्रेमाने लोकं 'डब्बू' म्हणून ओळखतात. वयाच्या 10 व्या वर्षांपासून त्यांना नृत्याची आवड आहे. त्यांची डान्सची इतकी क्रेझ आहे की काॅलेजमध्ये स्नेहसंमेलनात त्यांच्या डान्सची खास फर्माईश असते.

श्रीवास्तव हे गोविंदा, मिथुन चक्रवर्ती आणि जावेद जाफरीचे जबरा फॅन आहे. त्यांनी अनेक नृत्य स्पर्धेत भाग घेतलाय. वयाच्या 45 वर्षीही ते आवडीने नृत्य करतात.

संजीव यांनी पत्नी अंजली श्रीवास्तव या सुद्धा त्यांच्या नृत्य प्रेमामुळे चांगलं ओळखून आहे. लग्नाच्या दिवशी सुद्धा त्यांनी डान्स केला होता असा किस्सा त्यांनी आवर्जून सांगितला.

संजीव यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ फेसबुकवर तुफान शेअर होतोय. व्हाॅट्सअॅप, युट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.

संजीव यांच्या पत्नी अंजली सांगताय की, त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली. मी जेव्हा स्टेजवर जाण्यासाठी पोहोचते तेव्हा फक्त बाजूला उभं राहणे आवडते.

जर संजीव यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर त्यांना कुणाचाही साथ घेऊन नाचण्याची आवश्यकता भासत नाही असंच दिसतं. ते गोविंदा प्रमाणेच एकटेच माहोल तयार करू शकतात.

First published: June 1, 2018, 10:45 PM IST

ताज्या बातम्या