सांगलीची चांगली माणसं, गणेश मंडळांनी डाॅल्बीच्या पैशातून उभारले 2 बंधारे

सांगलीची चांगली माणसं, गणेश मंडळांनी डाॅल्बीच्या पैशातून उभारले 2 बंधारे

गणेशोत्सवात डॉल्बीच्या दणदणाटानं होणारं ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस डिपार्टमेंटनं पुढाकार घेतला. डॉल्बीचा पैसा जलयुक्त शिवाराच्या कामासाठी खर्च करण्याचं आवाहन केलं.

  • Share this:

आसिफ मुरसल, सांगली

24 मे : गेल्या गणेशोत्सवात सांगली जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांनी "डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवार' ही संकल्पना मांडली. यासाठी गणेश मंडळांनी सढळहस्ते मदत केली. यातून जिल्ह्यातून दोन बंधारे आकाराला आलेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुखर्ता या बंधाऱ्याचं लोकार्पण करण्यात आलंय.

सांगली जिल्ह्यातल्या मल्लेवाडीतला हा सुखकर्ता बंधारा...यात म्हैसाळ योजनेचं पाणी साठलंय. त्याचा एक हजार एकर शेतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाणीपुरवठा होऊ लागलाय. येथून काही अंतरावरून म्हैसाळ प्रकल्पाचा एरंडोली शाखा कालवा जातो. त्यातून सोडलेल्या पाण्यानं बंधारा भरलाय आणि उन्हाळ्यात हा परिसर पाण्याखाली आलाय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बंधाऱ्याचं लोकार्पण झालं.

बंधाऱ्याला सुखकर्ता हे नाव का दिलं, याची गोष्टही मजेदार आहे. गणेशोत्सवात डॉल्बीच्या दणदणाटानं होणारं ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस डिपार्टमेंटनं पुढाकार घेतला. डॉल्बीचा पैसा जलयुक्त शिवाराच्या कामासाठी खर्च करण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यातल्या 863 गणेश मंडळांनी 27 लाख 80 हजार रुपये पोलिसांना दिले. मल्लेवाडी येथे सुखकर्ता बारमाही बंधारा आणि मणेराजुरी येथे विघ्नहर्ता बंधारा बांधला गेला.

समाजात रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या सांगली पोलिसांनी जलयुक्त शिवारासारख्या विधायक कार्यात घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रतिसादाला आवाहन देत गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवलंय. सण आणि उत्सवांना असंच विधायक कार्याचं स्वरूप आलं तर आपला समाज लय भारी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2017 09:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading