'येथे कार्यकर्ते भाड्याने मिळतील'!

सांगलीतील शास्त्री चौक ते हरीपूर रस्ता पाटणे प्लॉट या दरम्यानच्या एका चौकात काळ्या रंगाच्या सूचना फलकावर खडूने लिहिलेला मजकूर राजकारण्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2018 11:32 PM IST

'येथे कार्यकर्ते भाड्याने मिळतील'!

सांगली, 03 जुलै : निवडणूक आणि त्या निवडणुकांमध्ये युवकांचा प्रचारासाठी होत आलेला वापर हा तसा काही नवीन नाही. मात्र या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा वापर करून त्यांना जेवणावळ्या, दारू आणि पैशांचे आमिष दाखवून ते लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर पुढे त्या नेत्याच्या प्रचारासाठी झटलेला कार्यकर्ता युवक दुर्लक्षित राहतो. सांगली महापालिका निवडणूकीची रणधूमाळी सुरू असताना दुसरीकडे मात्र प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील असा बोर्ड भर चौकात लावल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.  निवडणूक प्रचारसाठी 1 हजार रुपये हजेरीने मुले भाड्याने मिळतील, खालील नंबर वर संपर्क साधा, आणि आत्ताच सावकार व्हा अश्या आशयाचा बोर्ड लावला आहे.या बोर्डाचे फ़ोटो सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

सांगलीतील शास्त्री चौक ते हरीपूर रस्ता पाटणे प्लॉट या दरम्यानच्या एका चौकात काळ्या रंगाच्या सूचना फलकावर खडूने लिहिलेला मजकूर राजकारण्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा आहे. कारण या फलकावर जे लिहिलंय ते सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला लावणारं आहे.

VIDEO : माथेफिरूने शिक्षिकेची केली हत्या,नंतर शीर घेऊन रस्त्यावर धावत सुटला

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक १ ऑगस्ट रोजी होत आहे. दोन दिवसांपासून ढोल ताशांच्या गजरात इच्छुकांच्या मुलाखतींचा फेर सुरू आहे. एकेका इच्छुकाच्या मिरवणुकीत पाचशेपासूनच्या हजारापर्यंत "समर्थक' कार्यकर्ते दिसत आहेत.

गळ्यात मफलर, डोक्‍याला टोपी, हातात पक्षाचा झेंडा घेतलेली ही गर्दीतली माणसं खरंच कार्यकर्ता आहेत का हे तपासण्यासाठी कुठल्या लिटमस टेस्टची गरज उरलेली नाही. बहुतांश गर्दी ही भाडोत्री कार्यकर्त्यांची आहे. ती नेहमीच असते. ती कुठून जमवायची, कशी जमवायची. किती तासाला किती रोजंदारी द्यायची. पॅकेजमध्ये फक्‍त पैसे ठरवायचे की चहा नाष्ट्याची सोय करायची इथपर्यंत गोष्टी सांभाळणारे अघोषीत ठेकेदार राजकीय व्यवस्थेत तयार झाले आहेत.

Loading...

सोशलकल्लोळ : म्हणे,अंधेरी पुल दुर्घटनेत 'धोनी' जखमी ?

या फलकावर लिहिलंय आताच सावकार व्हा, भाडोत्री कार्यकर्ते मिळतील, एका कार्यकर्त्याचे एका दिवसाचे भाडे एक हजार रुपये असल्याचे लिहिले आहे. ते कुणी गंमतीने लिहिले आहे की खरंच असा उद्योग सुरू झालाय याची खातरजमा केली. त्यात संबंधीत फलक हा गंमतीचा भाग नसून खरोखरच भाडोत्री कार्यकर्ते पुरवणारे ठेकेदार नेत्यांशी संपर्क साधून असल्याचे दिसून आले.

पण हा बोर्ड लिहिण्याची का वेळ या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आली या प्रश्नाच उत्तर ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. गेल्या २० वर्षांपासून या भागातून नगरसेवक निवडून येतात दरवेळी कार्यकर्त्यांची रीघ त्यांच्यामागे असते. निवडणूक येते तरुणांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवली जातात, मात्र त्यानंतर त्या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष होते. युवक रात्रंदिवस प्रचारासाठी राबतात, पण निवडणूक झाल्यावर त्यांच्याकडेही दुर्लक्ष होते. सध्या सांगलीतील शिक्षित युवकांच्या हाती रोजगार तसा कमीच म्हणून एक वेगळा संदेश देण्यासाठी हा बोर्ड लिहिल्याचं इथले नागरिक सांगतात.

VIDEO : सहकाऱ्यांचा निरोप घेताना पोलीस अधिकाऱ्याला अश्रू अनावर

हाताला रोजगार नसल्यानं इथल्या युवकांनी आता फुकट कुणाची हमाली करायची नाही असं ठरवलंय. त्यामुळेच राजकारण्यांच्या कपाळकरंटे पणाच्या तिरस्कारामुळे हा बोर्ड इथल्या युवकांनी लिहिलाय. या निवडणुकीत कोणत्याही अमिषाला बळी न पडता. प्रामाणिकपणे प्रचार करतो मात्र दिवसाला हजार रुपये हजेरी अशा आशयाचा हा बोर्ड आहे.

VIDEO : एक्स्प्रेस वेवर कारचा विचित्र अपघात,सुरक्षा पट्टी कारच्या आरपार

मात्र सांगलीतल्या रोजगार नसलेल्या युवकांच्या सहनशीलतेच अंत झालेला आपण यातून पाहू शकतोय. महापालिकेच्या निवडणुकीला अजून एक महिन्याचा अवकाश आहे. या काळात अजून काय काय नमुने पहायला मिळतील याची सांगलीकरांना उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 11:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...