S M L

अपंगत्वावर मात करून बारावीत मिळवले 88 टक्के !

पूर्ण अपंगत्व वाट्याला आलेलं असतानाही औरंगाबादच्या सलोनी निराली हिनं 88 टक्के मार्क्स मिळवलेत. तिचं यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे असंच म्हणावं लागेल.

Sachin Salve | Updated On: Jun 1, 2017 12:04 AM IST

अपंगत्वावर मात करून बारावीत मिळवले 88 टक्के !

 सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

31 मे : पूर्ण अपंगत्व वाट्याला आलेलं असतानाही औरंगाबादच्या सलोनी निराली हिनं 88 टक्के मार्क्स मिळवलेत. तिचं यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे असंच म्हणावं लागेल.

काही मुलं जन्मताच विषेश असतात...ते अद्भूत शक्ती घेवूनच जन्माला येतात आणि सर्व अडचणींवर मात करूण ते आपले ध्येय साध्य करतातच...औरंगाबादच्या सलोनीनं हे सिद्ध केलं आहे...सलोनी अभ्यासासाठी पुस्तकही स्वत: उठून घेवू शकत नाही. त्याच सलोनीनं बारावीत 88 टक्के मार्क मिळवून विद्यार्थ्यासमोर आदर्श निर्माण केलाय.जग जिंकण्याची स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या सलोनी सामान्य मुलांसारखी नाही. दुर्धर आजारामुळे कायमचं अंपगत्व आलेल्या सलोनीला उठता बसता येत नाही. तिला तिचं पुस्तकही हातात धरता येत नाही. एवढं सगळं असूनही अपंगत्वावर मात करत तिनं बारावीत 88 टक्के मार्क्स मिळवलेत. सामान्य मुलांसारखं आयुष्य नसतानाही तिच्या जिद्द वाखण्याजोगी आहे. परीक्षेत अपयश आलं. किंवा कमी मार्क्स मिळाले म्हणून खचून जाऊ नये असं ती सांगते.

सलोनीची आई रेशमा याच तिच्या शिक्षक, मार्गदर्शक आहेत. सलोनीला अभ्यासात काही कमी पडू नये यासाठी या माऊलीनं जिवाचं रान केलं. आज तिचं हे यश पाहून तिला आकाशच ठेंगणं झालंय.

सलोनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर कामातही पुढं असते. त्यामुळे शेजाऱ्यासाठी ती सुपरगर्ल वाटते.

Loading...
Loading...

सलोनीचं आडनाव निराली असं आहे. तिनं तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर तिचं निराळेपण दाखवून दिलंय. सलोनीच्या पुढच्या भरारीसाठी ऑल द बेस्ट...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 12:04 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close