'राँग टर्न' दाम्पत्य ; 30 लोकांची केली हत्या खाल्लं मांस, मांसापासून बनवत होते लोणचं !

'राँग टर्न' दाम्पत्य ; 30 लोकांची केली हत्या खाल्लं मांस, मांसापासून बनवत होते लोणचं !

या दाम्पत्याने 1999 पासून 30 लोकांची हत्या करून त्यांचं मांस शिजवून खाल्याची विकृत घटना उजेडात आलीये. या विकृत दाम्यत्याने आपला गुन्हाही कबूल केलाय.

  • Share this:

27 सप्टेंबर : तुम्ही 'राँग टर्न' हा सिनेमा पाहिला असेल तर या सिनेमातील मिळती जुळती घटना रशियामध्ये घडलीये. एका नरभक्षक दाम्पत्याने 1999 पासून 30 लोकांची हत्या करून त्यांचं मांस शिजवून खाल्याची विकृत घटना उजेडात आलीये. याहुन कहर म्हणजे हे दाम्पत्य माणसांच्या मांसाचं लोणचे तयार करत होते. या विकृत दाम्यत्याने आपला गुन्हाही कबूल केलाय.

 दिमित्री बाकेशेव  आणि त्याची पत्नी नतालिया बाकेशेव

दिमित्री बाकेशेव आणि त्याची पत्नी नतालिया बाकेशेव

रशियातील क्रासनोदर शहरात राहणाऱ्या दिमित्री बाकेशेव 3(2 वय) आणि त्याची पत्नी नतालिया बाकेशेव अशी या विकृत दाम्पत्याचं नाव आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केलीये. नतालिया ही पेशाने नर्स आहे. पोलिसांना या दाम्पत्याच्या घरात 8 लोकांचे मृतदेह सापडले आहे.

हे विकृत दाम्पत्य आपल्या घरातील तळघरात लोकांची हत्या करून तिथेच ठेवत होते. एवढंच नाहीतर मृतदेहासोबत ते सेल्फीही काढत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांची हत्या केल्यानंतर त्यांची चमडी काढून घेत होते. पोलिसांना तळघरात एकूण 19 खोल्या आढळल्यात.

स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, पोलिसांना रस्त्यावर एक खराब मोबाईल सापडला होता. हा फोन जेव्हा तपासून पाहिला तेव्हा या विकृत दाम्पत्याने मृतदेहांसोबत काढलेले सेल्फी आढळले. त्यानंतर पोलिसांनी 11 सप्टेंबरला या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि नरभक्षक या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या.

हे दाम्पत्य लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी ड्रग्स देत होते. ड्रग्सचा नशा झाल्यानंतर त्यांची हत्या करत होते.

माणसाच्या मांसापासून लोणचं करत असल्याचंही समोर आलंय

माणसाच्या मांसापासून लोणचं करत असल्याचंही समोर आलंय

अटक केल्यानंतर पोलिसांनी या दोघांची मानसिक तपासणीही केली. त्यात हे दोघेही फीट होते.

या दोघांनी 30 लोकांचा हत्या का केली याचा शोध घेतला जात आहे. दिमित्री बाकेशेव आणि नतालिया हे दोघे कुठे भेटले आणि त्यांचं लग्न कसं झालं याची माहिती गोळा केली जात आहे.

पोलीस आता ज्या लोकांची हत्या झाली आहे त्यांचा शोध घेत आहेत.

तळघरातील पहिले दृश्य

First published: September 27, 2017, 9:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading