वाढदिवसाला मेणबत्ती विझवू नये,संघाची कुटुंब प्रबोधन मोहीम

वाढदिवसाला मेणबत्ती विझवू नये,संघाची कुटुंब प्रबोधन मोहीम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने "कुटुंब प्रबोधन" या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना घरी सण कसे साजरे करावे, जेवण कुठलं करावं आणि सणासुदीला कपडे कसे घालावे याचे प्रबोधन करण्यात येत आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर

19 जुलै : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनसामान्यांचे प्रबोधन करण्यासाठी कुटुंब प्रबोधन ही मोहीम हाती घेतली आहे. कुटुंबातील संवाद वाढवण्याचा यामागे उद्देश असल्याच सांगितलं जातंय. पण या मोहिमेवरून टीकेची झोडही उठवली जातेय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने "कुटुंब प्रबोधन" या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना घरी सण कसे साजरे करावे, जेवण कुठलं करावं आणि सणासुदीला कपडे कसे घालावे याचे प्रबोधन करण्यात येत आहे. यात वाढदिवस मेणबत्त्या विझवून करू नये आणि कौटुंबिक चर्चेतून राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट हे तीन विषय सोडण्यासही सांगण्यात आलंय.

संघाच्या वतीने कुटुंब प्रबोधनाचे काम जोरात देशभरात सुरू असून यासाठी विशेष टीम्सही तयार करण्यात आल्या आहेत. एकट्या विदर्भात यासाठी ११ जिल्ह्यांमध्ये प्रबोधनाचे काम सुरू आहे नागपुरात १२ भाग करून अनेक स्वयंसेवक घरो घरी जाऊन हे काम करताहेत.

कुटुंब प्रबोधन मोहिमेच्या दरम्यान संघाचे स्वयंसेवक या गोष्टी सांगताहेत.

१)    सणासुदीला भारतीय परंपरेचे कपडे घाला जसे पुरुषांसाठी कुर्ता पायजामा आणि महिलांनी साडी.

२)    जेवणास सुरुवात करण्याआधी मंत्राचे उच्चारण करावे

३)    वाढदिवसाला मेणबत्ती लावू नये आणि ती विझवू नये

४)    जेवण करतांना टीव्ही पाहू नये

५)    चांगले पुस्तके वाचावे जे काही ज्ञान देत असावे

६)    टीव्ही वर सामाजिक कार्यक्रम पाहावे

७)    घरी चर्चा करतांना राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट या विषयावर बोलू नये

८)    आठवड्यातून एक दिवस कुटुंबासोबत एकत्र बसावे

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे. हिंदुंप्रमाणेच मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील कुटुंबातीला लोकांचे प्रबोधन करण्याचा संघाचा मानस आहे. यासंदर्भात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनीधी सभेत विषयही चर्चेत आला आहे. पण या निर्णयावर टीकाही होतेय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांसोबत थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतंय. कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या घरात जाऊन जास्तीत जास्त लोकांना संघाच्या विचारधारेसोबत जोडण्याचा प्रयत्न आहे. पण लोकांच्या व्यक्तीगत आयुष्यात त्यांना सल्ला देण्याचा संघाच्या प्रयत्नावर टीकाही होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 07:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading